तब्बल 30 कोटी पगार, काम काय तर फक्त स्विच ऑन-ऑफ करणं; तरीही लोक नाकारतात ही नोकरी! कारण…

Published on -

एका नोकरीबद्दल सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे, काम साधं आहे, फक्त लाईट स्विच ऑन-ऑफ करायचं… आणि त्यासाठी पगार तब्बल ₹30 कोटी. ऐकून तुम्हालाही वाटलं असेल, “वा! अशी संधी कुठे मिळते?” पण या चमकदार पगारामागे एक असं भयाण वास्तव आहे, ज्यामुळे कोणीही ही नोकरी करायला तयार होत नाही.

लाईटहाऊसमधील नोकरी

मुद्दा आहे लाईटहाऊस म्हणजेच दीपगृह. समुद्राच्या मध्यभागी उभारलेलं हे टॉवर, ज्याचा उपयोग जहाजांना सुरक्षित वाट दाखवण्यासाठी होतो. पण ज्या ठिकाणी हे दीपगृह आहे, तिथं नुसती शांती नाही, तर प्रचंड एकांत आणि जीवघेणा धोका आहे. या ठिकाणी दिवसभर नव्हे, तर अनेक महिने एकटं राहावं लागतं. आजूबाजूला कुणीच नाही. एक फोन नाही, नजीकचं गाव नाही, आणि काही वेळाने माणसाशी संवादाची गरजच हरवून बसते.

या नोकरीचा दावा एका व्हायरल पोस्टमधून समोर आला, ज्यात सांगितलं गेलं की इजिप्तच्या “जुमोन” नावाच्या दीपगृहात ही संधी उपलब्ध आहे. फक्त लाईट ऑन-ऑफ करायचं काम, आणि त्यासाठी ₹30 कोटी मिळतात. पण, या दीपगृहाचं अधिकृत अस्तित्व कुठेही नोंदलेलं नाही. त्यामुळे अनेक तज्ज्ञांचा विश्वास आहे की ही कहाणी फक्त इंटरनेटवर एक अफवा आहे.

नेमकं सत्य काय?

खरं तर, दीपगृह रक्षक हे काम पूर्वी जास्त महत्त्वाचं होतं, पण आज ती बहुतेक ठिकाणी ऑटोमेटेड झाली आहेत. काही देशांत अजूनही हे काम अस्तित्वात आहे, पण पगार सरासरी $40,000 ते $60,000 म्हणजे ₹33 लाख ते ₹50 लाख दरवर्षी असतो. कोटींच्या पगाराचा काहीही संबंध नाही.

तरीही, हा जो “लाईट ऑन-ऑफ” करण्याचा भाग आहे, तो खरोखर इतका सोपा नाही. समुद्राच्या मध्यभागी वादळं, प्रचंड लाटा, आणि एकटेपणा या सगळ्यांशी सामना करणं, मानसिकदृष्ट्या खूप थकवणारं आहे. म्हणूनच, एवढा पगार मिळाल्याचं जरी समजलं, तरी त्या वातावरणात कोणीही राहण्यास तयार होईलच असं नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!