ऑफिसमध्ये यश, नाव, पदोन्नती, सन्मान मिळावा असं कोणाला वाटत नाही? पण काही वेळा आपण सर्व गोष्टी व्यवस्थित करत असूनही अपेक्षित यश आपल्या हातात येत नाही. कधी असं वाटतं की मेहनत घेतोय, पण काहीतरी अडचण येते, प्रगती थांबते. यामागे फक्त कर्म नाही तर आपल्या दैनंदिन सवयींमध्ये दडलेला अज्ञात अडथळाही असतो. विशेषत: आपली ऑफिस बॅग जी दररोज आपण सोबत घेऊन फिरतो, ती अनेकदा नकारात्मकतेचं मूळ बनते.

नाजूक वस्तू
ज्योतिषशास्त्रानुसार, आपल्या आयुष्यातील ऊर्जा, यश, आणि नातेसंबंध यावर आपण वापरत असलेल्या वस्तूंचाही प्रभाव असतो. ऑफिस बॅग ही केवळ कामासाठी लागणाऱ्या वस्तूंचा साठा नसून ती आपल्या ऊर्जेचे वाहक ठरते. त्यामुळे बॅगेत काय ठेवायचं आणि काय टाळायचं हे जाणून घेणं गरजेचं आहे. अनेकदा लोक काचेच्या शोभेच्या वस्तू, तुटणारी सामग्री किंवा डेकोरेशन आयटम्स बॅगमध्ये ठेवतात. परंतु ज्योतिषशास्त्र सांगतं की अशा नाजूक वस्तू बॅगेत असणं हे नकारात्मक ऊर्जा निर्माण करतं आणि करियरच्या प्रवासात अडथळा आणतं. त्यामुळे अशा वस्तू घरीच ठेवाव्यात, ऑफिसमध्ये नेण्याचं टाळावं.
तीव्र धार असलेल्या वस्तू
त्याचप्रमाणे, तीव्र धार असलेल्या वस्तूंमुळे जसं की कात्री, ब्लेड किंवा शार्प वस्तू यामुळे नात्यांमध्ये तणाव निर्माण होतो, हे केवळ लोककथांमध्ये नसून उर्जेच्या दृष्टिकोनातूनही हे खरं मानलं जातं. या वस्तूंमुळे सहकाऱ्यांसोबतचे संबंध ताणले जाऊ शकतात. म्हणून अशा वस्तू ऑफिस बॅगपासून दूर ठेवणं हितकारक.
जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तू
कधीकधी आपण अनावश्यकपणे जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तू बॅगमध्ये ठेवतो. वापरात नसलेले यंत्र, तुटलेले हेडफोन, केबल्स, जुनी बिलं, आणि अगदी तुटलेली पेनदेखील. या गोष्टी आपल्या बॅगेत जागा व्यापतातच, पण त्यासोबतच नको असलेली ऊर्जा देखील निर्माण करतात. यामुळे मन सतत अकार्यक्षम राहू लागतं आणि कामात लक्ष लागत नाही.
कपडे
बरेच जण ऑफिससाठी कपडे ठेवताना अतिरिक्त शर्ट, मफलर किंवा कधी-कधी वापरून झालेले, घाणेरडे कपडे बॅगमध्ये ठेवतात. ही एक अत्यंत चुकीची सवय आहे. अशा वस्तूंमधून नकारात्मक ऊर्जा उत्पन्न होते आणि त्याचा परिणाम आपल्या मूडवर आणि आत्मविश्वासावर होतो. स्वच्छता ही फक्त शरीरापुरती मर्यादित नाही, ती आपल्या वस्तूंमध्येही असावी लागते.
वैयक्तिक वस्तू
अखेरीस, आपल्या बॅगमध्ये अनेकदा आपण वैयक्तिक स्वच्छतेच्या वस्तू ठेवतो. जसं की कंगवा, टूथब्रश, इत्यादी. पण यामुळे आपल्या कामाच्या ऊर्जेवर परिणाम होतो असं मानलं जातं. या वस्तू फक्त घरासाठी असाव्यात. ऑफिसची बॅग ही केवळ कामाशी संबंधित, सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या गोष्टींसाठी असावी.