चाकू आणि कढई उलट ठेवणं टाळा, स्वयंपाकघरातील ‘या’ चुकांमुळे अन्नपूर्णा देवी होते नाराज!

Published on -

स्वयंपाकघर हे केवळ जेवण तयार करण्याचे ठिकाण नसून, ते घराच्या सौख्य, समृद्धी आणि आरोग्याचा मूळ स्त्रोत मानले जाते. भारतीय वास्तुशास्त्रात स्वयंपाकघराचे स्थान विशेष मानले गेले असून, येथे असलेल्या प्रत्येक वस्तूचे स्थान आणि स्थिती आपल्यावर सूक्ष्म पातळीवर प्रभाव टाकते. अन्न हे देवतेसमान मानले गेले असल्याने, स्वयंपाकघरात केलेल्या चुकाही देवाच्या कृपेपासून वंचित ठेवू शकतात. त्यामुळे स्वयंपाकघरात काही गोष्टी अनवधानानेही उलट्या ठेवण्याची सवय आपल्या आयुष्यात त्रासदायक ठरू शकते.

सर्वसामान्यतः, स्वयंपाक केल्यानंतर अनेकदा आपण कढई, भांडी किंवा चाकूसारख्या वस्तू सहजतेने उलट्या ठेवतो. परंतु वास्तुशास्त्र सांगते की अशा कृतींमुळे घरात राहणाऱ्या देवी अन्नपूर्णेचा अपमान होतो. विशेषतः कढई आणि त्यासारखी धातुची मोठी भांडी यांचे राहू ग्रहाशी संबंध जोडले जातात. वास्तुशास्त्रानुसार राहू नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे या वस्तू उलट्या ठेवणे म्हणजे घरात नकारात्मक उर्जा प्रवेश करणे होय. यातून कुटुंबात भांडणे, मानसिक ताण आणि अपयश यांसारख्या समस्या वाढू शकतात.

धारदार वस्तु उलट्या ठेऊ नका

स्वयंपाकघरात चाकू, काटे किंवा इतर तीव्र धार असलेल्या वस्तू उलट्या ठेवणे विशेषतः टाळायला हवे. या वस्तू अशा स्थितीत ठेवल्यास घरातील सदस्यांमध्ये परस्पर कटुता निर्माण होण्याची शक्यता वाढते, असे वास्तुशास्त्र सांगते. अशा छोट्या गोष्टी जरी आपल्याला किरकोळ वाटल्या, तरी त्यांच्या मागे असलेले सूक्ष्म ऊर्जा प्रवाह आपल्या जीवनावर प्रभाव टाकतात.

खराब नळ

तसेच, स्वयंपाकघरात नळातून पाणी सतत टपकत असेल, तर ते केवळ साधी गळती नसून, ते पैसे आणि आरोग्याच्या हानीचे संकेत मानले जातात. पाण्याचा प्रवाह जीवनातील ऊर्जा दर्शवतो. त्यामुळे अशा नळांना वेळीच दुरुस्त करणे आवश्यक असते, अन्यथा आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

खरकटी भांडी

रात्रीच्या वेळी घाणेरडी भांडी स्वयंपाकघरात ठेवणे ही देखील एक गंभीर वास्तुची चूक मानली जाते. असे केल्याने लक्ष्मी देवीचा अपमान होतो आणि घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करतात, असा समज आहे. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघर स्वच्छ ठेवणे आणि भांडी धुणे ही केवळ स्वच्छतेची बाब नसून, ती आध्यात्मिकदृष्ट्याही अत्यंत आवश्यक आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!