दृष्टीहीन असूनही अविश्वसनीय अचूकतेने भविष्य सांगणारी बल्गेरियन महिला बाबा वेंगा यांची ओळख जगभर आहे. त्यांनी अनेक महत्त्वाच्या घटनांची पूर्वकल्पना केली होती, ज्यामध्ये 9/11 हल्ला, ब्रेक्झिट, आणि कोविडसारख्या जागतिक संकटांचा समावेश आहे. अशात 2025 साठी त्यांनी केलेली भविष्यवाणी ऐकून अनेकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.

बाबा वेंगा यांनी 2025 मध्ये भयंकर भूकंप आणि त्सुनामी येण्याची शक्यता वर्तवली होती. विशेषतः जपानसारख्या भूकंपप्रवण देशांबाबत या भाकिताकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. अलीकडच्या काळात जपानमध्ये आणि पॅसिफिक क्षेत्रात लहान भूकंप जाणवले गेले, जे त्यांच्या भाकितांची नांदी असू शकतात. तरीसुद्धा, 2025 च्या अर्ध्यावर आल्यानंतरही मोठ्या त्सुनामीची घटना झालेली नाही.
बाबा वेंगा यांचे भाकीत
बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, 2025 मध्ये जागतिक स्तरावर आर्थिक मंदी येईल. सध्याच्या घडामोडींवर नजर टाकली तर अनेक देश मंदीच्या उंबरठ्यावर आहेत. बेरोजगारी वाढत आहे, कंपन्यांमध्ये टाळेबंदीची प्रक्रिया वेग घेत आहे आणि महागाई सामान्य माणसाचे कंबरडे मोडत आहे. या सर्व घटनांनी त्यांच्या भाकिताला काही अंशी खरे ठरवले आहे.
तसेच एलियनशी संवाद साधला जाईल, हे बाबा वेंगांचे सर्वात गूढ आणि वादग्रस्त भाकित आहे. आजच्या घडीला नासासह अनेक अंतराळ संस्था एलियनच्या शोधात गुंतलेल्या आहेत. अलीकडेच काही अशा रासायनिक संकेतांचा शोध लागला आहे जे जीवसृष्टीची शक्यता दर्शवतात. मात्र अजूनतरी एलियनशी थेट संपर्क झाल्याचा कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही.
बाबा वेंगांनी 2025 साली जगात अनेक नवीन रोग उद्भवतील, असेही सांगितले होते. कोविडनंतरचा काळ बघितला तर नवीन विषाणू, औषधांना प्रतिकार करणाऱ्या जंतूंचे वाढते प्रमाण आणि हवामान बदलामुळे होणारे रोग हे जगासाठी सततचे आव्हान ठरत आहेत. हे वास्तव पाहता, या भाकिताकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.