योगसाधनेचा प्रभाव केवळ मानसिक शांततेपुरता मर्यादित नाही, तर ती शरीराच्या आरोग्यासाठीही अमूल्य ठरते. विशेषतः पोटावरची चरबी, जी फक्त सौंदर्याचाच प्रश्न नाही तर अनेक आरोग्य समस्यांचे मुळदेखील असते, ती कमी करण्यासाठी योग एक नैसर्गिक आणि सुरक्षित उपाय आहे. अनेकदा आपण वजन कमी करण्यासाठी डाएटिंग, जिम किंवा सप्लिमेंट्स यांचा आधार घेतो, पण काही वेळा त्याचे दुष्परिणामही दिसतात. अशा वेळी जर तुम्ही दररोज फक्त 10 मिनिटे या तीन योगासानांना दिले, तर पोटाभोवतालची चरबी मेणासारखी वितळू शकते, तेही कोणतीही हानी न करता.

भुजंगासन
सर्वप्रथम बोलूया भुजंगासन म्हणजेच कोब्रा पोज विषयी. हे आसन केल्यावर पोटाच्या स्नायूंवर योग्य ताण येतो आणि तिथे साठलेली चरबी हळूहळू वितळण्यास मदत होते. त्याचबरोबर पचनक्रिया सुधारते आणि पाठदुखीपासूनही आराम मिळतो. विशेषतः ऑफिसमध्ये बसून काम करणाऱ्यांसाठी हे आसन अत्यंत फायदेशीर आहे. शरीराचा तणाव कमी करण्यासाठी आणि ऊर्जा वाढवण्यासाठी याचा नियमित सराव उपयुक्त ठरतो.
पवनमुक्तासन
पुढे आहे पवनमुक्तासन. या आसनामुळे पोटात साठलेला वायू बाहेर निघतो, ज्यामुळे पोटफुगी कमी होते आणि आतड्यांचे कार्य सुधारते. हे आसन विशेषतः सकाळी उपाशीपोटी केल्यास अधिक फायदेशीर ठरते. एकप्रकारे हे आसन पचनसंस्थेला चालना देतं आणि अनावश्यक साठलेल्या चरबीवर हळूहळू परिणाम करते.
नौकासन
शेवटी, नौकासन म्हणजे बोट पोज हे आसन म्हणजे पोटावर लक्ष केंद्रित करणारा अत्यंत प्रभावी व्यायाम. या व्यायाममुळे शरीर संतुलित राहतं आणि तुम्हाला दीर्घकाळासाठी स्थिर परिणाम मिळतो. नियमित सरावाने पोटावरची चरबी कमी होतेच, पण त्याचबरोबर पाठीचा कणा आणि पायांची ताकदही वाढते.
या तिन्ही आसनांचा परिणाम एका दिवसात दिसणार नाही, पण जर संयम, शिस्त आणि सातत्य राखलं, तर एक महिन्यानंतर तुम्हाला नक्कीच समाधानकारक परिणाम दिसतील. केवळ पोटाची चरबीच नाही, तर एकंदरीत शरीर अधिक हलकं आणि उत्साही वाटू लागेल.