रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी! मोफत धान्य हवं असेल तर आत्ताच ‘हे’ काम करून घ्या, सरकारने हजारो कार्ड्स केलेत रद्द

Published on -

देशातील अनेक गरजू कुटुंबांसाठी केंद्र सरकारने रेशन कार्डसारखी योजना सुरू केली, ज्याचा उद्देश गरीब व वंचित घटकांपर्यंत मोफत अन्नधान्य पोहोचवण्याचा आहे. पण या योजनेचा लाभ सुरुच राहावा यासाठी सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा नियम आखलेला आहे, जर तुम्ही ठराविक कालावधीनंतर तुमचं रेशन कार्ड अपडेट केलं नाही, तर ते रद्द होऊ शकतं.

रेशन कार्ड हे फक्त एक ओळखपत्र नसून, अनेक घरांचं जीवन टिकवणारं साधन आहे. ‘राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा’ लागू झाल्यापासून गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना स्वस्त दरात तांदूळ, गहू आणि डाळी मिळू लागल्या. पण यामागचा उद्देश हा होता की गरजू व्यक्तीच या योजनेचा खरा लाभ घेतील. त्यामुळे रेशन कार्डसंदर्भातील माहिती सातत्याने अद्ययावत ठेवणं गरजेचं बनतं.

KYC बंधनकारक

सरकारच्या नियमानुसार, प्रत्येक कार्डधारकाने दर 5 वर्षांनी केवायसी म्हणजेच ‘नो युअर कस्टमर’ प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे. यात आधार कार्ड, मोबाईल नंबर, पत्ता आणि ओळखपत्र यांसारखी माहिती पुन्हा तपासून ती रेशन कार्डवर अपडेट केली जाते. यामुळे कोणताही फसवणुकीचा प्रकार टाळता येतो आणि बनावट लाभार्थ्यांना रोखता येतं.

जर ही प्रक्रिया दुर्लक्षित केली गेली, तर रेशन कार्ड रद्द केलं जाऊ शकतं आणि अशा स्थितीत लाभ घेणं अशक्य होतं. म्हणूनच, कोणत्याही त्रासापासून वाचण्यासाठी आणि घरचा रेशन नियमितपणे मिळत राहावा यासाठी ही प्रक्रिया वेळेवर पूर्ण करणं अत्यावश्यक आहे.

कुठे करता येईल KYC?

तुमचं रेशन कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्ही जवळच्या रेशन दुकानात जाऊ शकता. त्याशिवाय सीएससी सेंटर किंवा अधिकृत ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातूनही हे काम घरबसल्या पूर्ण करता येतं. ही प्रक्रिया फार जटिल नाही, पण वेळेवर न केल्यास परिणाम गंभीर होऊ शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!