पावसाळ्यातील दमट हवामानामुळे चेहऱ्यावर मळकटपणा, मुरुमांचे डाग आणि कोरडेपणाची झळ बसते. यावर आपल्या स्वयंपाकघरातच अशी एक जादूची वस्तू आहे, जी कच्च्या दुधात मिसळून लावल्यास चेहरा नव्याने उजळतो. हा उपाय केवळ सोपा नाही, तर अगदी सुरक्षित आणि केमिकल फ्रीसुद्धा आहे. त्यामुळे ज्यांना महागडे क्रीम वापरण्याची भीती वाटते किंवा नैसर्गिक उपायांची शाश्वती हवी असते, त्यांच्यासाठी हा घरगुती उपाय एक वरदानच ठरतो.

बेसन आणि कच्चे दूध
बेसन आणि कच्च्या दुधाचे मिश्रण हा उपाय कित्येक पिढ्यांपासून सौंदर्यसंपन्नतेसाठी वापरला जातो आहे. बेसन हे त्वचेला खोलवर स्वच्छ करण्याचे काम करते. यामुळे चेहऱ्यावरील मृत पेशी निघून जातात आणि त्वचा नव्याने खुलू लागते.
त्याचवेळी कच्चे दूध हे त्वचेला पोषण देते आणि त्वचेतील ओलसरपणाला टिकवून ठेवते. या दोन गोष्टी एकत्र केल्यावर एक असा नैसर्गिक फेस मास्क तयार होतो, जो त्वचेला फक्त उजळवतोच नाही, तर डाग, रेषा आणि कोरडेपणा दूर करून चेहरा नितळ करतो.
हा फेस मास्क तयार करणे खूप सोपे आहे. फक्त 2 चमचे बेसन, 3-4 चमचे कच्चे दूध आणि 1 चमचा मध एकत्र करायचे. हळद घालायची असल्यास ती ही थोडीशी टाकू शकता, त्यामुळे अँटीबॅक्टेरियल गुणही मिळतात. हे सगळं एकत्र करून एकसंध पेस्ट बनवा आणि ती चेहऱ्यावर लावा. लावल्यावर हलक्या हाताने मसाज करा आणि ही पेस्ट सुकण्यासाठी 15 ते 20 मिनिटे सोडा. शेवटी कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.
नियमित वापर करा
या फेस मास्कचा वापर नियमित केला, तर चेहऱ्यावरील डाग हळूहळू कमी व्हायला लागतात, त्वचेचा पोत मऊसर होतो आणि नैसर्गिक चमकही दिसायला लागते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, यामध्ये कोणतेही रसायन नसल्यामुळे तो कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी सुरक्षित आहे.