अनेक वेळा आपण विचार करतो की एखाद्या माणसाचा स्वभाव, नाती टिकवण्याची क्षमता आणि आयुष्यातील मोठे निर्णय हे अगदी जन्मदिवशीच ठरतात का? आपल्या संस्कृतीत अंकशास्त्र म्हणजेच ‘Numerology’ ही अशी एक शाखा आहे, जी अशा प्रश्नांना थोड्याफार प्रमाणात उत्तर देण्याचा प्रयत्न करते. आज आपण अशाच काही जन्मतिथींच्या आधारावर मुलांच्या वैवाहिक जीवनाविषयी जाणून घेणार आहोत, ज्या तारखांना जन्मलेली मुलं नातेसंबंधात प्रामाणिक, प्रेमळ आणि जबाबदार असतात, आणि त्यांचे लग्नही लवकर होण्याची शक्यता जास्त असते.

मूलांक 4
अंकशास्त्रानुसार, जर एखाद्या मुलाचा जन्म 4, 9, 13, 18, 22, 27 किंवा 31 तारखेला झाला असेल, तर त्या मुलाचा मूलांक 4 असतो. या मूलांकावर राहू ग्रहाचा प्रभाव राहतो. राहूचा प्रभाव असलेली ही मुलं आयुष्यात थोडी हट्टी, पण खूप चिकाटीची आणि भावनात्मकदृष्ट्या स्थिर असतात. त्यांच्या निर्णयांमध्ये गंभीरता असते आणि एकदा प्रेमात पडले की ती नातं ते शेवटपर्यंत निभावतात.
ही मुलं नात्यांना खूप महत्त्व देतात. विशेषतः लग्न झाल्यानंतर, ते आपल्या जोडीदाराच्या सुख-दुःखात साथ देणारे, त्याला मनापासून मान देणारे असतात. पत्नीच्या हसऱ्या चेहऱ्यासाठी ही मुलं काहीही करायला तयार असतात. त्यांच्या स्वभावात एक विशिष्ट शांतता आणि सहनशीलता असते, जी त्यांच्या वैवाहिक जीवनात एक स्थैर्य आणते. पत्नीला किंवा कुटुंबाला त्रास होईल, असे कोणतेही वागणे ते टाळतात. उलट ते तिला आनंदी ठेवण्यासाठी सतत काहीतरी करत राहतात.
पत्नीच्या मनावर राज्य करतात ही मुले
या मुलांचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांचा सेवाभावी स्वभाव. ते केवळ घरातील माणसांनाच नव्हे, तर समाजातील गरीब, गरजू आणि अडचणीत असलेल्या लोकांनाही मदतीचा हात पुढे करतात. त्यांच्या या दयाळू वृत्तीमुळे पत्नीचं त्यांच्यावर प्रेम अधिक गहिरं होतं.
विशेष म्हणजे 9, 18 आणि 27 तारखेला जन्मलेली मुलं लग्नासाठी थोडी घाई करतात. म्हणजेच त्यांच्या आयुष्यात लवकर विवाह होण्याची शक्यता जास्त असते. पण याचवेळी त्यांचं वैवाहिक आयुष्य हे गोड, प्रेमळ आणि समाधानी असतं. एकमेकांवर प्रेम, आदर आणि विश्वासाचा पाया असल्यामुळे त्यांचं नातं अनेक आव्हानांवर यशस्वीपणे मात करतं.