जर तुम्ही कमी किमतीत एखादी प्रीमियम आणि फीचर्सने भरलेली स्मार्टवॉच शोधत असाल, तर सध्या Amazon वर सुरू असलेली बंपर सेल ही उत्तम संधी ठरू शकते. 10,000 रुपयांच्या आत मिळणाऱ्या या घड्याळांमध्ये स्टायलिश लुक, आकर्षक फीचर्स आणि विश्वासार्ह ब्रँड्सचा समावेश आहे. चला तर मग, पाहूया कोणते आहेत हे सर्वोत्तम पर्याय…

टायटन सेलेस्टर
Amazon वर ही घड्याळ 9,995 रुपयांना सूचीबद्ध आहे. जर तुम्ही PNB क्रेडिट कार्डने पेमेंट केलंत, तर तुम्हाला मिळेल 10% इन्स्टंट डिस्काउंट (₹1,250 पर्यंत). त्यामुळे घड्याळाची प्रभावी किंमत 9,000 रुपयांच्या आसपास येते. क्लासिक लुक आणि प्रीमियम डिझाईन यामुळे हे घड्याळ अनेकांना आवडू शकते.
नॉईज प्रो 6 मॅक्स
ही स्मार्टवॉच फक्त 7,999 रुपयांना उपलब्ध आहे. सर्व बँकांच्या कार्डवर ₹1,000 पर्यंत फ्लॅट डिस्काउंट मिळतो, त्यामुळे अंतिम किंमत 6,999 रुपये होते. यात मोठी डिस्प्ले, हेल्थ ट्रॅकिंग, आणि लाँग बॅटरी बॅकअप यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.
फॉसिल मेन स्टेनलेस स्टील ग्रँट
स्टाईल आणि दर्जा हवा असल्यास, फॉसिल हा ब्रँड बेस्ट ठरतो.ही वॉच 8,697 रुपयांना मिळत आहे आणि PNB कार्ड वापरल्यास अंतिम किंमत होते फक्त 7,827 रुपये. फॉर्मल किंवा कॅज्युअल लुकला ती परफेक्ट मॅच करते.
अमेझफिट अॅक्टिव्ह 2
ही स्मार्टवॉच सध्या 9,999 रुपयांना लिस्ट आहे. PNB क्रेडिट कार्ड डिस्काउंटनंतर किंमत होते 8,999 रुपये. यात फिटनेस ट्रॅकिंग, अॅक्टिव्हिटी मॉनिटरिंग आणि स्मार्ट नोटिफिकेशन्ससारखे प्रगत फीचर्स आहेत.
फास्ट्रॅक फँटम स्मार्ट वॉच
तरुणांसाठी खास डिझाईन केलेली ही वॉच 7,995 रुपयांना उपलब्ध आहे. PNB कार्डद्वारे पेमेंट केल्यास किंमत 7,195 रुपये होते. यामध्ये हेल्थ ट्रॅकिंग, ब्लूटूथ कॉलिंग आणि वॉच फेस कस्टमायझेशनसारखी वैशिष्ट्ये मिळतात.
जर तुम्हाला कमी बजेटमध्ये फीचर्सने भरलेली, स्टायलिश आणि विश्वासार्ह स्मार्टवॉच हवी असेल, तर वरील पर्याय खूप फायदेशीर ठरू शकतात. ऑफर लिमिटेड वेळेसाठी आहे, त्यामुळे ऑर्डर करण्यासाठी विलंब करू नका.