जर तुम्ही सध्या 12,000 रुपयांच्या आत एक दर्जेदार स्मार्टफोन शोधत असाल, तर मोटोरोलाचे काही निवडक फोन तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरू शकतात. सध्याच्या स्पर्धात्मक मोबाईल मार्केटमध्ये स्वस्त किंमत आणि चांगले फीचर्स दोन्ही मिळणं जवळपास अशक्य वाटतं, मात्र मोटोरोला यात नेहमीच एक विश्वासार्ह नाव बनून राहिलं आहे. खास करून विद्यार्थ्यांसाठी, पहिला फोन घेणाऱ्यांसाठी किंवा सेकंडरी फोन म्हणून काहीतरी चांगलं पाहत असलेल्या वापरकर्त्यांसाठी हे फोन अगदी परिपूर्ण आहेत.
Motorola G05 4G

सुरुवात करूया सर्वात स्वस्त आणि किफायतशीर फोनपासून. Motorola G05 4G हा फोन सध्या Amazon वर फक्त ₹7,950 मध्ये उपलब्ध आहे. या किमतीत तुम्हाला 4GB RAM आणि 64GB इंटरनल स्टोरेज मिळतं, जे सामान्य वापरासाठी बेस्ट आहे. MediaTek Helio G81 सारखा प्रोसेसर यामध्ये दिला आहे, जो दैनंदिन कामांसाठी उत्तम आहे. 6.67 इंचाचा मोठा डिस्प्ले, Dolby Atmos ऑडिओ, 50MP कॅमेरा आणि 5,200mAh बॅटरी यामुळे हा फोन एंट्री-लेव्हल युजर्ससाठी एक सॉलिड पॅकेज ठरतो.
Motorola G35 5G
दुसऱ्या क्रमांकावर आहे Motorola G35 5G. ₹10,349 या किमतीत तुम्हाला 5G कनेक्टिव्हिटी मिळते. 4GB RAM आणि 128GB स्टोरेजसह येणाऱ्या या फोनमध्ये Unisoc T760 प्रोसेसर दिला आहे. 6.72 इंचाचा Full HD+ डिस्प्ले आणि 50MP कॅमेरा यामुळे फोनमध्ये व्हिडिओ बघणं आणि फोटोग्राफी दोन्हीचा आनंद घेता येतो. 5,000mAh बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंगमुळे एकदा चार्ज केल्यानंतर फोन सहजपणे दिवसभर साथ देतो.
Motorola G45 5G
तिसरा सर्वात पावरफुल पर्याय आहे Motorola G45 5G. या फोनची किंमत ₹11,748 असून, तो 8GB RAM आणि 128GB स्टोरेजसह येतो. Snapdragon 6s Gen 3 प्रोसेसरसारखा सक्षम चिपसेट, 120Hz रिफ्रेश रेट असलेला स्मूद डिस्प्ले आणि 5,000mAh बॅटरी यामुळे गेमिंगपासून मल्टीटास्किंगपर्यंत सर्व गोष्टी सहज शक्य होतात. शिवाय Dolby Atmos साऊंडमुळे मूव्ही बघण्याचा अनुभव आणखी समृद्ध होतो.
जर तुमचं बजेट ₹12,000 च्या आत असेल आणि तुम्हाला एक चांगल्या फीचर्ससह फोन हवा असेल, तर या मोटो फोनची यादी तुमच्यासाठी उत्तम ठरेल. यामध्ये 5G, दमदार कॅमेरा, मोठ्या बॅटरी आणि आकर्षक डिझाइनचं परफेक्ट कॉम्बिनेशन मिळतं.