अवघ्या 9999 रुपयांत खरेदी करा 5200mAh बॅटरी, 6GB रॅम आणि AI फीचर्सवाला स्मार्टफोन! उद्या पहिली सेल

Published on -

भारतीय बाजारात बजेट स्मार्टफोनचा पर्याय शोधणाऱ्यांसाठी एक दिलासाद बातमी आहे. 17 जुलैपासून Infinix चा Hot 60 5G+ स्मार्टफोन पहिल्यांदाच सेलसाठी उपलब्ध होतो आहे आणि विशेष म्हणजे, या फोनची पहिल्या दिवशीची किंमत फक्त 9,999 रुपये ठेवण्यात आली आहे. 10,000 च्या आत एक 5G फोन मिळणं हीच एक आकर्षक गोष्ट असताना, यामध्ये असलेल्या फीचर्समुळे हा फोन आणखीच उठून दिसतो आहे.

Infinix Hot 60

Infinix Hot 60 5G+ भारतात 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजच्या एकाच व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. त्याची मूळ किंमत 10,499 रुपये असली तरी पहिल्या सेलमध्ये तुम्ही तो 500 रुपयांनी स्वस्तात म्हणजे 9,999 रुपयांना विकत घेऊ शकता. रंगांच्या बाबतीतही हा फोन लक्षवेधी आहे. शॅडो ब्लू, स्लीक ब्लॅक आणि टुंड्रा ग्रीन या तीन आकर्षक शेड्समध्ये तो येतो.

फोनमध्ये 6.7 इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz च्या रिफ्रेश रेटसह आणि 700 निट्स ब्राइटनेससह येतो. म्हणजेच, स्क्रोलिंग एकदम स्मूथ आणि बाहेरच्या उजेडातही स्क्रीन स्पष्ट दिसणारी आहे. त्यात MediaTek Dimensity 7020 चा प्रोसेसर असून 6GB LPDDR5X RAM आणि Android 15 आधारित XOS 15 सॉफ्टवेअरचा समावेश आहे, जे त्याला वेगवान आणि आधुनिक बनवतं.

AI फीचर्स

या फोनमध्ये एक खास एआय बटण दिलं गेलं आहे, जे पारंपरिक व्हॉल्यूम आणि पॉवर बटणाखाली बसवलेलं आहे. हे बटण वापरून युट्यूब, गुगल मॅप्ससह 30 हून अधिक अ‍ॅप्स सहजपणे उघडता येतात. याच बटणावरून एआय व्हॉईस असिस्टंट फोलॅक्स चालू करता येतो, ज्यामुळे स्मार्टफोनचा वापर अधिक सुलभ आणि स्मार्ट होतो.

गेमिंगसाठीही Infinix Hot 60 5G+ एक विशेष अनुभव देतो. HyperEngine 5.0 Lite गेमिंग टेक्नोलॉजी आणि XBoost AI गेम मोडमुळे गेम खेळताना स्मूद आणि रिस्पॉन्सिव्ह अनुभव मिळतो. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हा त्यांच्या सेगमेंटमधील असा पहिलाच फोन आहे जो 90fps पर्यंत गेमिंगला सपोर्ट करतो, जे खऱ्या अर्थाने गेमर्ससाठी पर्वणी ठरू शकते.

कॅमेरा आणि बॅटरी

फोटोग्राफीच्या बाबतीतही हा फोन कमी नाही. त्यामध्ये मागच्या बाजूला 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे, जो ड्युअल मोड व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. फ्रंटला 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे, जो व्हिडिओ कॉल्स आणि सेल्फीसाठी पुरेसा आहे.

एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे UltraLink Connectivity यामुळे नेटवर्क नसलं तरी Infinix ते Infinix फोनदरम्यान कॉल करता येतो. ग्रामीण किंवा नेटवर्क कमी असलेल्या भागांसाठी ही एक अत्यंत उपयुक्त सोय ठरू शकते.

फोनची 5200mAh क्षमतेची बॅटरी दिवसभराचा आरामदायक वापर सुनिश्चित करते. ही बॅटरी बायपास चार्जिंग आणि रिव्हर्स वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. पावसाळ्यात सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून, फोन IP64 स्प्लॅश आणि डस्ट रेसिस्टंट आहे. याशिवाय, फोनची जाडी फक्त 7.8 मिमी असल्याने तो हातात घेतल्यावरही हलकासा आणि आरामदायक वाटतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!