आता घरात मोठ्या स्क्रीनवर थेट सिनेमागृहाचा अनुभव घेण्याची वेळ आली आहे, आणि त्यासाठी तुमच्या खिशालाही फारसा ताण बसणार नाही! Amazon वर 32 इंचाच्या स्मार्ट टीव्हींच्या जबरदस्त ऑफर्स सुरू आहेत, ज्यामध्ये काही मॉडेल्स फक्त ₹7,000 पासून मिळू लागले आहेत. जर तुम्ही घरासाठी, अभ्यासासाठी किंवा ऑफिससाठी एक बजेट-फ्रेंडली आणि फीचर-पॅक्ड टीव्ही शोधत असाल, तर ही संधी नक्कीच सोडू नका.
आजकाल स्मार्ट टीव्ही म्हणजे फक्त मोठा स्क्रीन नाही, तर तो एक मल्टीटास्किंग एंटरटेनमेंट यंत्र बनलाय जिथे तुम्ही OTT कंटेंट पाहू शकता, गेमिंग करू शकता, YouTube आणि इंटरनेटवर सहज सर्फिंगही करता येते. हे सगळं तुम्हाला आता अगदी ₹7,000 ते ₹12,000 च्या दरम्यान मिळणार आहे.

TCL चा 32 इंची टीव्ही
TCL चा 32 इंची V4C सिरीज स्मार्ट टीव्ही यादीत टॉपवर आहे. यामध्ये QLED पॅनल असल्यामुळे चित्राची स्पष्टता आणि रंग एकदम लक्षवेधी असतात. यामध्ये Google Assistant, 1GB रॅम आणि 8GB स्टोरेजसह HD रेडी रिझोल्यूशन आहे. बँक ऑफरनंतर याची किंमत फक्त ₹11,990 आहे. म्हणजेच, एकदम स्टायलिश आणि तगडा पर्याय.
Xiaomi चा स्मार्ट टीव्ही
Xiaomi चा स्मार्ट टीव्ही देखील मागे नाही. त्याची किंमत HDFC कार्डने खरेदी केल्यास ₹11,499 इतकी कमी होते. यामध्ये 760p रिझोल्यूशन, 60Hz रिफ्रेश रेट, Chromecast, OTT अॅप्ससाठी सपोर्ट, आणि Google TV इंटरफेसचा समावेश आहे.
Skywall चा 32 इंचाचा टीव्ही
सर्वात परवडणारा पर्याय शोधत असाल तर Skywall चा 32 इंचाचा टीव्ही एक उत्तम पर्याय आहे. केवळ ₹6,751 मध्ये मिळणारा हा Android 12 बेस्ड टीव्ही तुम्हाला Full HD अनुभव देतो आणि Wi-Fi देखील बिल्ट-इन आहे. त्याचा मोठा डिस्प्ले घरात एक वेगळाच माहोल निर्माण करतो.
Redmi चा F सिरीज स्मार्ट टीव्ही
Redmi चा F सिरीज स्मार्ट टीव्ही त्याच्या Fire OS आणि Alexa Voice Remoteसाठी प्रसिद्ध आहे. त्याचा इंटरफेस एकदम सहज आणि जलद आहे. ह्या टीव्हीची किंमत सध्या बँक ऑफरनंतर ₹10,499 आहे.
शेवटी एसर ब्रँडवर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी Acer चा 32 इंच JC सिरीज Google TV ही एक जबरदस्त निवड आहे. यात Bluetooth, Wi-Fi, HDMI, USB हे सगळे कनेक्टिव्हिटी पर्याय आहेत. याची किंमत बँक ऑफरनंतर ₹9,999 इतकी होते, जी त्याच्या क्वालिटीला पाहता एकदम योग्य वाटते.
या सर्व टीव्हीमध्ये कमीतकमी किंमत, उच्च दर्जाचे फीचर्स, आणि नावाजलेल्या ब्रँड्सचा समावेश आहे. त्यामुळे जर तुम्ही स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करत असाल, तर आजच Amazon वर भेट द्या आणि ही ऑफर संपण्याआधीच त्याचा फायदा उचला.