जर तुम्ही तुमचा फोन रिचार्ज करताना बजेटचा विचार करत असाल आणि 200 रुपयांच्या आत एक असा प्लॅन हवा असेल ज्यात कॉलिंग आणि डेटा दोन्ही मिळेल, तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. Jio, Airtel आणि Vi (Vodafone-Idea) या तिन्ही कंपन्यांनी ग्राहकांसाठी काही अतिशय परवडणारे आणि उपयुक्त प्रीपेड प्लॅन सादर केले आहेत. या प्लॅनमध्ये ना फक्त अमर्यादित कॉलिंग आणि डेटा मिळतो, तर काही प्लॅनमध्ये OTT अॅप्सचा मोफत अॅक्सेसही दिला जातो. चला तर मग, या स्वस्त आणि दमदार रिचार्ज प्लॅन्सवर एक नजर टाकूया.
Jio चे स्वस्त प्लॅन्स

सुरुवात करूया Jio कडून. Jio चा 100 रुपयांचा प्लॅन एक खास डेटा पॅक आहे ज्यात 5GB इंटरनेट दिलं जातं आणि याची वैधता तब्बल 90 दिवसांची आहे. विशेष म्हणजे, यामध्ये JioCinema किंवा JioTVसारख्या अॅप्सचा अॅक्सेस देखील मोफत दिला जातो. कमी किमतीत दीर्घ वैधता आणि थोडकाच का होईना, इंटरनेटचा पर्याय पाहता हा प्लॅन occasional users साठी उत्तम आहे.
जर तुम्हाला थोडा जास्त डेटा आणि कॉलिंग हवा असेल, तर Jio चा 198 रुपयांचा प्लॅन उत्तम पर्याय ठरतो. 14 दिवसांसाठी दररोज 2GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि रोज 100 SMS यामध्ये मिळतात. शिवाय JioTV आणि इतर अॅप्सचाही मोफत वापर करता येतो.
Airtel चे स्वस्त प्लॅन्स
Airtel देखील आपल्या वापरकर्त्यांसाठी आकर्षक पर्याय देतंय. 199 रुपयांमध्ये मिळणाऱ्या प्लॅनमध्ये 28 दिवस वैधता, अमर्यादित कॉलिंग आणि 2GB डेटा मिळतो. Airtel Xstream अॅपचा मोफत अॅक्सेससुद्धा यामध्ये आहे, त्यामुळे मनोरंजनासाठी वेगळा खर्च करण्याची गरज नाही.
Airtel चा आणखी एक पर्याय म्हणजे 149 रुपयांचा डेटा पॅक. यामध्ये 1GB डेटा दिला जातो आणि वैधता तुमच्या मूळ प्लॅनप्रमाणे असते. पण या प्लॅनची खासियत म्हणजे त्यामध्ये 22 पेक्षा अधिक OTT अॅप्सचा अॅक्सेस मोफत मिळतो, जे फार कमी प्लॅनमध्ये पाहायला मिळतं.तसेच Airtel चा 100 रुपयांचा प्लॅन देखील 5GB डेटा देतो आणि याची वैधता 30 दिवस असते. हा प्लॅन हलक्या इंटरनेट वापरासाठी किंवा आपत्कालीन डेटा आवश्यकतेसाठी योग्य आहे.
Vodafone-Idea चे प्लॅन्स
Vodafone-Idea कडे पाहिल्यास, त्यांच्याकडेही 200 रुपयांच्या आत उत्तम पर्याय आहेत. 199 रुपयांचा प्लॅन 28 दिवस वैध असून, यामध्ये 2GB डेटा, 300 मोफत SMS आणि अमर्यादित कॉलिंग दिलं जातं. हा प्लॅन त्यांच्यासाठी उत्तम आहे ज्यांना साधारण वापरासाठी रिचार्ज हवा असतो.
याशिवाय Vi चा 189 रुपयांचा प्लॅन 26 दिवसांची वैधता देतो आणि त्यात 1GB डेटा आणि मोफत कॉलिंगचा लाभ मिळतो. कमी डेटा वापर करणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.