नारळ, तीळ की सूर्यफूल…ऑइल पुलिंगसाठी सर्वोत्तम तेल कोणते?, जाणून घ्या योग्य आयुर्वेदिक पद्धत!

Published on -

सकाळी उठून दात घासण्याआधी जर कोणी तुम्हाला सांगितलं की फक्त 14 दिवस एक सोपी सवय अंगीकारा आणि त्याचे चमत्कारिक परिणाम तुमच्या दातांपासून त्वचेपर्यंत सगळ्या आरोग्यावर दिसू लागतील, तर? आयुर्वेदात मान्यता असलेली ही पारंपरिक पद्धत म्हणजे “ऑइल पुलिंग” एक अशी सोपी आणि घरगुती कृती, जी शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यात मदत करते आणि तोंडाच्या स्वच्छतेसाठी खूप उपयुक्त ठरते.

ऑइल पुलिंगचे फायदे

ऑइल पुलिंगची कल्पना ऐकायला थोडी विचित्र वाटू शकते, पण ही पद्धत अनेक शतकांपासून वापरली जात आहे. यामध्ये सकाळी उठून काही मिनिटे तोंडात विशिष्ट तेल फिरवायचं असतं आणि नंतर ते थुंकून टाकायचं. ही क्रिया शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढते, असं आयुर्वेद म्हणतो. हे तेल बॅक्टेरिया आपल्या आत खेचून घेतं, त्यामुळे तोंडात उगम पावणारे अनेक आजार, दुर्गंधी आणि संसर्ग कमी होतो.

दातांमध्ये चमक आणायची असेल, पिवळसरपणा आणि डाग कमी करायचे असतील, तर ऑइल पुलिंग हा एक सहज आणि स्वस्त उपाय आहे. यामुळे हिरड्यांमध्ये असणारी सूज आणि वेदनाही कमी होते. विशेषतः तीळ तेल यामध्ये खूप उपयुक्त ठरतं, कारण त्यात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात.

फक्त तोंडाचं आरोग्यच नव्हे, तर शरीराची प्रतिकारशक्ती वाढवणं, त्वचेचा नूर वाढवणं आणि पाचन सुधारणं यासारखे फायदेसुद्धा नियमित ऑइल पुलिंगमुळे मिळतात. त्वचेत झळाळी येते, डोळ्यांखालची काळी वर्तुळे कमी होतात आणि चेहऱ्यावरचा थकवा दूर होतो. काहींना डोकेदुखी किंवा मायग्रेनच्या त्रासातूनही आराम मिळतो, हे विशेष!

योग्य तेल कोणते?

हे सगळं करताना योग्य तेल निवडणं महत्त्वाचं आहे. नारळ तेल हे अनेकांचा आवडता पर्याय आहे, कारण ते सौम्य आणि प्रभावी असतं. याशिवाय, तीळ तेल आणि सूर्यफूल तेल देखील उत्तम पर्याय आहेत. परंतु हे सगळं करताना लक्षात ठेवा, फक्त सेंद्रिय, थंड दाबलेलं (cold pressed) तेल वापरणंच फायदेशीर ठरतं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!