प्रत्येकाच्या आयुष्यात असतो एक असा खास जोडीदार, ज्याच्याबरोबर नातं केवळ प्रेमातच नाही, तर आत्म्यांमध्येही गुंफलेलं असतं. आपण अनेकदा म्हणतो की “या दोघांचं नातं इतकं सुंदर आहे की ते जन्मोजन्मीचं वाटतं.” पण खरंच काही नाती अशी असतात का जी इतकी मजबूत असतात की त्यात कधीच तडा जात नाही? अंकशास्त्र या प्राचीन ज्ञानशाखेमध्ये याचं उत्तर मिळतं.

श्रावण महिना सुरू झालेला असताना, जो की भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या अमर प्रेमाची आठवण करून देतो, त्याच काळात काही जोड्यांच्या नात्यांबाबतही एक विशेष तथ्य समोर येतं. ते म्हणजे काही विशिष्ट तारखांना जन्मलेली जोडपी, ज्यांची नाती कधीही तुटत नाहीत. हा केवळ विश्वास नसून, अंकशास्त्रावर आधारित अभ्यासातून सिद्ध झालेले एक गूढ सत्य आहे.
मूलांक 2
मूलांक शोधण्याची पद्धत अगदी सोपी आहे. ज्यांचा जन्म 2, 11, 20 किंवा 29 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 2 मानला जातो. हे लोक भावनाशील, समजूतदार आणि प्रेमळ स्वभावाचे असतात. दुसरीकडे, ज्यांचा जन्म 7, 16 किंवा 25 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 7 असतो. हे लोक तितकेच गूढ, अंतर्मुख आणि आध्यात्मिक प्रवृत्तीचे मानले जातात.
मूलांक 7
मूलांक 2 आणि 7 या दोघांचं नातं खरंच अद्भुत मानलं जातं. चंद्र आणि केतू या दोन ग्रहांचा प्रभाव या दोन्ही संख्यांवर असल्याने त्यांचं संयोजन अतिशय संतुलित आणि शांततामय असतं. चंद्र जसा प्रेम, कोमलता आणि भावनांचा कारक आहे, तसाच केतू गूढ ज्ञान, आध्यात्म आणि अंतर्ज्ञानाचा प्रतिनिधी. त्यामुळे या दोघांच्या नात्याला एका वेगळ्याच प्रकारचं बळ लाभतं, जे कोणत्याही संघर्षातही कोसळत नाही.
स्वभाव आणि गुण
या मूलांकांच्या जोडप्यांमध्ये असा भावनिक समतोल असतो की ते न बोलता एकमेकांच्या मनातले विचार समजू शकतात. अशा नात्यांत शब्दांची गरज कमी आणि समजूतदारपणाची खोली अधिक असते. एकमेकांच्या सुख-दुःखात ते संपूर्णपणे सहभागी होतात. त्यामुळे त्यांचं नातं केवळ या जन्मापुरतं मर्यादित राहत नाही, तर अनेक जन्मांपर्यंत चालतं, असं मानलं जातं.
असा विश्वास आहे की या दोघांची जोडी अगदी शिव-पार्वतीप्रमाणे आहे. अढळ, अपरिवर्तनीय आणि शाश्वत. हे नातं इतकं समर्पित आणि निर्मळ असतं की ते इतरांसाठीही आदर्श ठरतं. म्हणूनच जर तुमचा किंवा तुमच्या जोडीदाराचा जन्म या तारखांमध्ये झालेला असेल, तर कदाचित तुमचं नातंही अमर प्रेम असलेलं आहे.