मेकअप करण्यापूर्वी चुकूनही गुलाब जल लावू नका, चुकीच्या पद्धती त्वचेला पोहोचवतात हानी! जाणून घ्या योग्य वापर

Published on -

उन्हाळ्याच्या तापलेल्या दिवसांमध्ये गुलाबपाणी म्हणजे एक थंडगार दिलासा. याच्या गंधाने आणि थंडाव्याने त्वचेला तरतरी मिळते, म्हणूनच अनेक महिला आपल्या स्किन केअरमध्ये याचा समावेश करतात. मात्र, जेव्हा हे गुलाबपाणी चुकीच्या पद्धतीने वापरले जाते, तेव्हा ते तुमच्या चेहऱ्यासाठी फायदेशीर ठरण्याऐवजी हानिकारक सिद्ध होऊ शकते. गुलाबपाणी म्हणजे केवळ सुंदरतेचा भाग नाही, तर त्यामागे योग्य ज्ञान असणं गरजेचं आहे.

मेकअपपूर्वी गुलाब जल टाळा

उन्हाळ्यात गुलाबपाणी लावल्यावर काही वेळातच जर तुम्ही थेट उन्हात गेलात, तर त्वचेला उलट त्रास होऊ शकतो. त्वचेवर जळजळ, लालसरपणा, टॅनिंग यांसारखे परिणाम दिसून येऊ शकतात. म्हणून गुलाबपाणी लावल्यानंतर तुम्ही जर घराबाहेर पडणार असाल, तर त्याआधी सनस्क्रीनचा वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे पाणी नैसर्गिक वाटले तरी प्रत्येक त्वचेसाठी ते योग्यच असेल असे नाही. तेलकट किंवा अतिसंवेदनशील त्वचा असणाऱ्यांना यामुळे अ‍ॅलर्जी, मुरुमं किंवा चट्टे होण्याचा धोका असतो. त्यामुळे आधी पॅच टेस्ट करूनच गुलाबपाणी वापरावे.

झोपताना करा वापर

रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करून कापसाच्या मदतीने गुलाबपाणी लावल्यास त्याचा खरा उपयोग होतो. रात्रीच्या वेळी त्वचा स्वतःची दुरुस्ती करते आणि गुलाबपाण्यामुळे तिला नैसर्गिक मदत मिळते. यामुळे त्वचेला सॉफ्टनेस आणि ग्लो मिळतो. मात्र बाजारात मिळणारं प्रत्येक गुलाबपाणी शुद्ध असतंच असं नाही. अनेकदा त्यात परफ्यूम, रसायनं आणि प्रिझर्वेटिव्ह्स घातलेले असतात, जे त्वचेला नुकसान पोहोचवू शकतात. म्हणून नेहमी शक्य असल्यास सेंद्रिय आणि पारंपरिक पद्धतीने तयार केलेलं गुलाबपाणी निवडावं.

टोनर म्हणून वापरा

गुलाबपाणी दिवसातून 1-2 वेळा टोनर म्हणून वापरणं पुरेसं असतं. अनेकजण दर दोन तासांनी चेहऱ्यावर फवारणी करतात, जे त्वचेच्या नैसर्गिक तेलांचा समतोल बिघडवते. तसेच, मेकअप लावण्याआधी गुलाबपाणी लावणे टाळावे. यामुळे त्वचा खूपच हायड्रेट होऊन मेकअप व्यवस्थित बसत नाही आणि चेहरा तेलकट दिसू शकतो. याऐवजी मेकअपपूर्वी त्वचेवर फक्त हलकासा मॉइश्चरायझर लावावा.

अतिउष्ण हवामानात गुलाबपाणी आणि कोरफडीचा जेल मिसळून लावल्यास त्वचेवर होणाऱ्या जळजळीतून सुटका मिळते आणि ती थंड राहते. मात्र, काही लोक गुलाबपाण्याने चेहरा धुण्याची चूक करतात. हे योग्य नाही कारण गुलाबपाणी क्लिन्झर नाही. ते केवळ टोनर किंवा रिफ्रेशर म्हणूनच वापरावे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!