तुम्हीही थेट गॅसवर पोळ्या भाजून खाताय?, या सवयीने वाढतो कॅन्सरचा धोका! आरोग्य तज्ज्ञांचा गंभीर इशारा

Published on -

भारतीय स्वयंपाकघरात रोज बनणाऱ्या पोळीला केवळ अन्न मानले जात नाही, ती एक संस्कृती आहे. पण या परंपरेत एक गंभीर चूक आपल्या नकळत रुजली आहे. ती म्हणजे गॅसवर थेट पोळ्या भाजण्याची सवय. वेळ वाचवण्याच्या नादात अनेकजण रोटी पोळी तव्यावर न भाजता थेट गॅसच्या ज्वाळेवर फुगवतात. ही कृती दिसायला जरी सामान्य वाटत असली, तरी तिचे परिणाम शरीरावर अत्यंत गंभीर असू शकतात.

WHO चा इशारा

थेट गॅसच्या आचेवर पोळी भाजल्याने त्यात कार्बन मोनोऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइडसारखे विषारी वायू आणि सूक्ष्मकण चिकटतात. WHO च्या अहवालानुसार हे घटक श्वसनाचा त्रास, अस्थमा, हृदयविकार आणि दीर्घकाळात कर्करोगाचंही कारण ठरू शकतात. विशेषतः घरातील वायुवीजन नीट नसेल तर हे पदार्थ आणखी धोकादायक ठरतात.

अशा प्रकारे भाजलेल्या पोळ्या/चपात्या सतत खाल्ल्यास पचनतंत्रावर वाईट परिणाम होतो. पोटदुखी, उलटी, गॅसचा त्रास यांसारखे लक्षणं सुरू होतात आणि ती पुढे जाऊन गंभीर स्वरूप धारण करू शकतात. शरीरात जमा होणारे सूक्ष्म विषारी घटक हळूहळू कर्करोगाला निमंत्रण देतात.

‘ही’ पद्धत वापरा

यामुळे पोळी बनवताना योग्य पद्धत वापरणं गरजेचं आहे. तव्यावर दोन्ही बाजूंनी नीट भाजून, सुती कापडाने हलकं दाबून फुगवलेली पोळी अधिक सुरक्षित आणि पोषणमूल्यांनी समृद्ध असते. ही पद्धत वेळ घेणारी असली तरी आरोग्यासाठी हितकारक आहे.

आजच्या घडीला आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. एक छोटीशी गाफील सवयही दीर्घकाळात आपल्या शरीरावर मोठा परिणाम करू शकते. म्हणूनच, गॅसवर थेट पोळ्या भाजणं थांबवा आणि तव्यावर पोळी भाजण्याची सवय लावा. ही छोटी कृती तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी मोठा फरक घडवू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!