तुम्हीही रात्रीचा शिळा भात गरम करून खाताय?, मग ही धक्कादायक माहिती वाचाच!

रोजच्या जेवणात भात नसला की, जेवण अपूर्णच वाटते. पण याच भातामुळे आपल्या शरीरात मोठ्या आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात, हे जर सांगितलं तर? विशेषतः जर तुम्ही ‘शिळा भात’ म्हणजे उरलेला भात खाण्याची सवय ठेवत असाल, तर ही सवय तुम्हाला आतून पोखरू शकते.

शिळा भात का खाऊ नये?

आपल्यातील बऱ्याच लोकांना वाटतं की शिळा भात वाया घालवू नये, त्यामुळे ते दुसऱ्या दिवशी गरम करून खातात. पण यामागे एक भयंकर सत्य लपलेलं आहे. प्रसिद्ध पोषणतज्ज्ञ रायन फर्नांडो यांच्या मते, शिळ्या भातामध्ये बॅसिलस सेरियस नावाचा जीवघेणा बॅक्टेरिया तयार होतो. विशेष बाब म्हणजे हा बॅक्टेरिया शिजवताना किंवा गरम करतानाही नष्ट होत नाही.

जेव्हा भात एका विशिष्ट तापमानावर शिजवला जातो आणि मग खोलीच्या तापमानावर थोडा वेळ ठेवला जातो, तेव्हा हे बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणात वाढतात. ते नुसते वाढत नाहीत, तर आपल्या शरीरात गेल्यावर विषारी तत्त्वही सोडतात, जे आपल्या पाचन संस्थेवर थेट परिणाम करतात. त्यामुळे पोट फुगणे, मळमळ, उलटी, अतिसार यांसारख्या त्रासांचा धोका वाढतो.

भात कधी आणि कशाप्रकारे खावा?

हे ऐकून अनेकांना प्रश्न पडेल, मग भात खायचाच नाही का? याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे. भात खा, पण योग्य पद्धतीने. रायन फर्नांडो सांगतात की, शिजवलेला भात शक्यतो लगेचच खा. काही कारणाने जर तात्काळ खाणं शक्य नसेल, तर तो लगेच फ्रिजमध्ये ठेवा आणि 24 तासांच्या आत वापरा. त्यापेक्षा जास्त वेळ झाला तर तो शरीरासाठी घातक ठरू शकतो. त्याला गरम करून, मसाला घालून स्वादिष्ट बनवता येईल, पण शरीरासाठी तो विषारी असतोच.

खरंतर आपली भारतीय पद्धत ही भाजी-भाकरी किंवा वरण-भात असो, ती पारंपरिक आहे, पण काही सवयी काळानुसार तपासून घेणं गरजेचं आहे. शिळा आपल्या आतड्यांना सडवण्यासही कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे शक्यतो भात गरम करून खाणे टाळाच.