फ्रीजमध्ये दोन-दोन दिवस अन्नपदार्थ ठेवताय? मग एकदा नक्की वाचा हा हादरून टाकणारा रिपोर्ट!

Published on -

आजकाल अनेक जण जेवण वाया जाऊ नये म्हणून शिजवलेले अन्न फ्रिजमध्ये ठेवतात आणि मग दुसऱ्या दिवशी पुन्हा गरम करून ते अन्न खाल्ले जाते. मात्र, तुम्हाला माहित आहे का की फ्रिजमध्ये जास्त वेळ ठेवलेले अन्न तुमच्यासाठी विषासारखे ठरू शकते? योग्य काळजी न घेतल्यास, अन्नामध्ये सूक्ष्मजंतू तयार होऊन शरीरात गंभीर आजार उद्भवू शकतात.

अन्न फ्रिजमध्ये ठेवणं ही आजची अत्यंत सामान्य सवय आहे. विशेषतः जेव्हा वेळ कमी असतो किंवा जेवण उरलेलं असतं, तेव्हा ते थेट डब्यात भरून फ्रिजमध्ये ढकललं जातं. दुसऱ्या दिवशी ते गरम करून आपण निवांतपणे खातो. पण हेच अन्न जर बऱ्याच वेळ फ्रिजमध्ये राहिलं, तर ते विषासारखंही बनू शकतं.

फ्रीजमध्ये अन्न किती वेळ ठेवणे योग्य?

अमेरिकेच्या कृषी विभागाने म्हणजेच USDA ने याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे. त्यांच्या मते, शिजवलेले अन्न जर शिजल्यावर 2 तासांपेक्षा अधिक वेळ बाहेर राहिलं, तर ते थेट फ्रिजमध्ये ठेवणं धोकादायक ठरू शकतं. त्यात बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता खूप असते. यामुळे फूड पॉइझनिंगसारख्या गंभीर त्रासांना निमंत्रण मिळते.

फ्रिजमधील अन्न किती वेळ सुरक्षित राहू शकतं, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. काहींच्या मते अन्न दोन दिवस ठेवलं तरी काही होत नाही, पण वास्तविकता अशी आहे की 3 ते 4 तासांपेक्षा जास्त काळ अन्न फ्रिजमध्ये ठेवणं टाळावं. विशेषतः उकडलेलं, शिजवलेलं किंवा आधीच गरम केलेलं अन्न गरम करायचं असेल, तर ते शक्यतो लवकर खाल्लं जावं.

काय कळजी घ्याल?

अन्न विषबाधेचे अनेक प्रकार असतात आणि त्याचे परिणाम कधी सौम्य, तर कधी जीवघेणे असू शकतात. उलटी, जुलाब, ताप, थकवा आणि काही वेळा हॉस्पिटलमध्ये भरती होण्याची वेळ देखील येऊ शकते. विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि गर्भवती महिलांसाठी ही बाब फारच गंभीर ठरते.

यासाठी काही महत्त्वाच्या सवयी अंगीकारणं आवश्यक आहे. शिजवलेले अन्न नेहमी बंद डब्यातच ठेवा आणि ते शक्यतो 4°C (39°F) च्या खालील तापमानावरच साठवा. अन्न नेहमी झाकून ठेवा, जेणेकरून ते हवेच्या संपर्कात येणार नाही. डब्याचा वापर स्वच्छ आणि कोरडा असावा. फ्रीजमध्ये जास्त वेळासाठी अन्न साठवणं आवश्यक असेल, तर ते डीप फ्रीजमध्ये ठेवा आणि वापरण्यापूर्वी व्यवस्थित गरम करा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!