20 रुपयांच्या बाटलीत खरंच मिनरल वॉटर असतं की नळाचं पाणी?, ‘असं’ ओळखा सत्य!

Published on -

आपण शहरांमध्ये, बसस्थानकांवर किंवा रेल्वे प्लॅटफॉर्मवर गेलो की थोडं जरी पाणी प्यायचं असलं तरी आपण सहजपणे थंडगार पाण्याची बंद बाटली विकत घेतो. तिच्यावर लिहिलेला एखादा मोठा ब्रँडचा लोगो पाहून आपण ते पाणी शुद्धच असणार, असं गृहीत धरतो. पण हेच पाणी खरंच नैसर्गिक झऱ्यांतून घेतलेलं खनिज पाणी असतं का, की ते केवळ नळाचं पाणी असतं याचा आपण कधी विचार करतो का?

बाजारात सहज उपलब्ध असलेल्या पाण्याच्या बाटल्या आपण मिनरल वॉटर समजून पितो. त्या प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये भरून, फ्रीजमध्ये थंड करून विकल्या जातात. तहान भागवणं महत्त्वाचं असलं तरी आपण काय पितो हे समजून घेणं त्याहून महत्त्वाचं आहे. अनेक कंपन्या आज या पाण्याच्या बाटल्या मोठ्या आत्मविश्वासाने विकतात आणि ग्राहक त्यांच्यावर तेवढ्याच विश्वासाने पैसे खर्च करतो. पण सत्य काय?

“PWS” म्हणजे काय?

खरं म्हणजे प्रत्येक पाण्याच्या बाटलीवर, ती कुठून घेतलेली आहे याचा उल्लेख असतो. हे वाचणं आणि समजून घेणं फारसं कठीण नाही. पण आजही फार कमी लोक अशा बारकाव्यांकडे लक्ष देतात. उदाहरणार्थ, पाण्याच्या बाटलीवर जर “PWS” असं लिहिलेलं असेल, तर त्याचा अर्थ ‘Public Water Source’ म्हणजेच सार्वजनिक जलस्रोत असतो. म्हणजेच ते पाणी एखाद्या महानगरपालिकेच्या नळातून घेऊन शुद्ध केलं गेलेलं असतं. यामध्ये नैसर्गिक खनिजांचं काही विशेष अस्तित्व नसतं.

काही आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी तर अगदी उघडपणे कबूल केलंय की त्यांच्या बाटल्यांमध्ये पिण्याचं पाणी असलं तरी ते नैसर्गिक झऱ्यांचं नाही, तर थेट नळाचं पाणी असतं. त्यानंतर ग्राहकांची दिशाभूल होऊ नये म्हणूनच अशा बाटल्यांवर ‘PWS’ असं लिहिण्याचं बंधन आलं. म्हणजेच ग्राहकाने त्यावरून लगेच लक्षात घ्यावं की या बाटलीतील पाणी कुठून आलेलं आहे.

BIS आणि FSSAI चिन्ह

मात्र, यात सगळं पाणी नळाचं आहे असं नाही. काही कंपन्या खऱ्या अर्थाने नैसर्गिक झऱ्यांमधून मिळणारं ‘Spring Water’ किंवा खनिजांनी युक्त ‘Mineral Water’ विकतात. अशा बाटल्यांवरही ते स्पष्टपणे नमूद केलेलं असतं. पण हे ओळखायचं असेल, तर आपण ते बारकाईने वाचायला आणि समजून घ्यायला हवं.

अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे BIS आणि FSSAI हे चिन्हं. ही चिन्हं म्हणजे त्या पाण्याची आणि प्लास्टिक बाटलीची गुणवत्ता तपासून ती भारत सरकारच्या मान्यताप्राप्त निकषांवर खरी उतरते का हे निश्चित केल्याचं प्रमाणपत्र असतं. त्यामुळे ही चिन्हं दिसत नसतील, तर ती बाटली कितीही आकर्षक वाटली तरी ती खरेदी करणं टाळावं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!