नीता अंबानी पितात जगातलं सर्वात महाग पाणी?, एका बाटलीच्या किंमतीत येईल आलीशान घर!

Published on -

नीता अंबानी यांच्या वैभवशाली जीवनशैलीबद्दल आपण अनेकदा ऐकत असतो. जगातील सर्वात महागडं घर, अप्रतिम दागिने, आणि लक्झरी ब्रँड्सची आवड. अशाच एका चर्चेने अलीकडे सोशल मीडियावर खळबळ उडवली. चर्चा होती की त्या जगातील सर्वात महागडं पाणी पितात. एका पाण्याच्या बाटलीची किंमत इतकी सांगितली गेली की, त्या रकमेत आरामदायक लक्झरी कार किंवा घर खरेदी करता आले असते! पण हे खरंच कितपत सत्य आहे?

ही चर्चा सुरू झाली एका फोटोमुळे. नीता अंबानी यांचा तो फोटो व्हायरल होताच, अनेकांनी असा दावा केला की त्या Aqua di Cristallo Tributo a Modigliani या खास पाण्याच्या बाटलीतून पाणी पितात. आता या पाण्याबद्दल ऐकल्यावर कुणीही थक्क होईल. कारण ही बाटली केवळ पाण्यासाठी नाही. ती एक शोभेची, लक्झरी आणि कलात्मक वस्तू मानली जाते.

एका बाटलीची किंमत 44 लाख?

या बाटलीचं वैशिष्ट्य म्हणजे ती 24 कॅरेट सोन्याने बनलेली आहे. शिवाय या पाण्यात अगदी सूक्ष्म प्रमाणात सोन्याची धूळ मिसळलेली असते. पाण्याचे स्रोतही सामान्य नाहीत. फ्रान्स, फिजी आणि आइसलँडमधील शुद्ध आणि नैसर्गिक झऱ्यांतून हे पाणी घेतले जाते. हे ऐकूनच लक्षात येतं की ही बाटली म्हणजे आरोग्य, सौंदर्य आणि श्रीमंती यांचं एकत्रित प्रतीक आहे.

 

या बाटलीचं डिझाइन प्रसिद्ध कलाकार Fernando Altamirano यांनी केलं आहे. आणि 2010 मध्ये तिची किंमत सुमारे $60,000 म्हणजे जवळपास ₹44 लाख इतकी लिलावात मिळाली होती. त्यामुळेच तिला Guinness World Records मध्ये जागा मिळाली. या सगळ्या गोष्टींमुळे ती केवळ एक बाटली न राहता एक संग्रहणीय वस्तू, एक स्टेटस सिंबॉल ठरते.

हा दावा खरा की खोटा?

पण खरा प्रश्न असा की, नीता अंबानी खरंच हे पाणी पितात का? या चर्चेमागे कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही. हा दावा केवळ एका फोटोवर आधारित होता, ज्यात अशी कोणतीही खात्री देता येईल अशी माहिती नव्हती. रिलायन्स किंवा नीता अंबानी यांच्याकडूनही याबाबत कोणतं अधिकृत वक्तव्य झालेलं नाही. त्यामुळे हा बनावट दावा असल्याचे स्पष्ट होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!