आपले नाव ही केवळ ओळख नव्हे, तर आपल्या स्वभावाचे, विचारधारेचे आणि भविष्याचे संकेतही देते. ज्योतिषशास्त्रात नावाच्या पहिल्या अक्षरावरून व्यक्तीच्या वागणुकीचे, भावना समजून घेण्याचे आणि यशाच्या प्रवासाचे विश्लेषण केले जाते. आज आपण जाणून घेणार आहोत A, K, M, N, S आणि G या अक्षरांनी सुरू होणाऱ्या नावांच्या व्यक्तींविषयी, आणि त्यांच्या आयुष्यात कोणत्या विशेष गुणांचा प्रभाव असतो.
A अक्षर

हे लोक अत्यंत मेहनती, स्पष्टवक्ते आणि आत्मनिर्भर असतात. प्रेमात हे थोडेसे लाजाळू असले तरी एकदा नातं जोडले की, त्यासाठी सर्वस्व देतात. त्यांची प्रामाणिकता आणि आत्मविश्वास त्यांना उच्च पदापर्यंत नेते.
K अक्षर
समस्या कितीही मोठी असो, हे लोक न घाबरता सामोरे जातात. कोणत्याही सामाजिक किंवा व्यावसायिक वातावरणात पटकन मिसळतात. मित्र असो वा शत्रू, कुणावरही संकट आलं तर हे लोक मदतीला धावून येतात.
M अक्षर
स्वत:च्या विचारांमध्ये ठाम आणि आत्मकेंद्री असणारे हे लोक अत्यंत समजूतदार असतात. योग्य-अयोग्याची स्पष्ट जाणीव असून बोलताना खूप विचार करतात. त्यामुळे हे लोक जीवनात हळूहळू पण निश्चितपणे प्रगती करत राहतात.
N अक्षर
हे आधुनिक विचारांचे आणि थोडेसे स्पष्टवक्ते असतात. लोकांतील त्रुटी लगेच ओळखतात, पण स्वतःची महत्त्वाकांक्षा आणि आशावाद यामुळे पुढे जात राहतात. प्रेमासाठी ते कोणतीही अडचण पार करू शकतात.
S अक्षर
अत्यंत मेहनती, जबाबदार आणि प्रेमाच्या बाबतीत खूप संवेदनशील असतात. हे लोक भावना लपवतात पण प्रेमात प्रामाणिक असतात. त्यांच्या गंभीरतेमुळे ते इतरांपेक्षा अधिक विश्वासार्ह वाटतात.
G अक्षर
हे लोक शांत स्वभावाचे आणि खूप राखीव असतात. आपली खास गोष्ट फारशा कोणाशी शेअर करत नाहीत. प्रेमभावना खोलवर असल्या तरी त्यांना व्यक्त करायला वेळ लागतो. संयमी आणि सुसंस्कृत असतात.