गरम तेल, वाफ किंवा चहा अंगावर सांडल्यास घाबरू नका! ‘या’ घरगुती उपायाने लगेच थांबेल जळजळ

Published on -

घरात रोजच्या धावपळीत स्वयंपाक करताना कधी गरम तेल उडतं, तर कधी चहा किंवा वाफ हातावर पडते, त्यावेळी होणारी तीव्र जळजळ अक्षरश: रडवायला आणते. कित्येकदा आपण गोंधळून जातो काय करावं, कसं करावं? पण अशा प्रसंगी काही साधे, घरातच सहज करता येणारे उपाय तुमच्या वेदनेला तात्काळ आराम देऊ शकतात आणि पुढच्या त्रासापासून तुमचा बचावही करतात.

थंड पाणी ओता

जर भाजलेली जागा फार मोठी नसेल, तर पहिल्यांदा तुम्ही काय करता हे खूप महत्त्वाचं ठरतं. अशा वेळी थंड पाण्याचा ओघ सुरू करणे हा सर्वात प्रभावी उपाय ठरतो. जळालेल्या त्वचेवर थंड पाणी 10 ते 15 मिनिटं सतत ओतल्याने ती जागा थोडी शांत होते आणि जळजळ कमी होण्यास मदत होते. मात्र, बर्‍याच जणांचा गैरसमज असतो की बर्फ लावल्याने अधिक आराम मिळेल, पण बर्फामुळे त्वचेला आणखी धक्का बसू शकतो, त्यामुळे तो टाळलेलाच बरा.

कोरफड जेल, बटाट्याचे काप

कोरफडीचा (Aloe Vera) वापर हा अगदी जुना आणि नैसर्गिक उपाय आहे. भाजल्यावर तिचा ताजा गर त्वचेवर लावल्यास थंडावा मिळतो, सूज कमी होते. अशाच प्रकारे बटाट्याचे पातळ स्लाईस कापून ते भाजलेल्या भागावर ठेवले, तरी त्वचेला थंडावा मिळतो आणि फोड येण्याची शक्यता कमी होते. ही एक प्रकारची घरात सहज सापडणारी नैसर्गिक थेरपीच आहे.

केळी

आता घरात असणाऱ्या साध्या गोष्टींचा विचार केला, तर केळीदेखील उपयोगी ठरते. केळ्याचा लगदा तयार करून तो भाजलेल्या जागेवर लावल्यास त्वचेला आंतरिक थंडावा मिळतो. हे ऐकायला थोडं अनपेक्षित वाटू शकतं, पण त्याचा परिणाम मात्र नक्की जाणवतो.

नारळ तेल

भाजल्यावर लगेच थोडंसं नारळ तेल लावल्याने ती जागा मऊ राहते, सूज कमी होते आणि त्वचेला अधिक नुकसान होण्यापासून वाचवता येतं. हे तेल विशेषतः उकळत्या पाण्यामुळे झालेल्या भाजण्यावर खूप फायदेशीर ठरतं.

कोलगेट

आणखी एक उपाय जो आपल्या बालपणात सगळ्यांनी अनुभवलेला असतो तो म्हणजे कोलगेट. यामध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असतात, जे त्वचेला आराम देतात आणि वेदना शांत करतात. या सगळ्या उपायांनी घरात सहज उपलब्ध गोष्टींच्या मदतीने तुम्ही भाजल्यावर तात्काळ आराम मिळवू शकता. पण जर जास्त भाजलं गेलं असेल, फोड आले असतील किंवा त्वचा काळपट झाली असेल, तर घरगुती उपाय न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!