जुलै महिना सुरू होताच आकाशातील ग्रहांची स्थिती एक वेगळंच नाट्य सादर करू लागते. या महिन्यात एक अत्यंत संवेदनशील योग तयार होत आहे, ज्याला षडाष्टक योग म्हणतात. हा योग सामान्यत: लोकांच्या जीवनात धक्का देणाऱ्या घटना घडवतो. या वेळेस शनी आणि मंगळ या दोन शक्तिशाली ग्रहांमधील अंतर सहावं आणि आठवं असल्यामुळे काही राशींवर या योगाचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या लोकांच्या राशीवर या ग्रहांची विशेष छाया आहे, त्यांच्यासाठी हा काळ मानसिक, आर्थिक आणि आरोग्यदृष्ट्या खूप त्रासदायक ठरू शकतो.
कधी तयार होतो ‘षडाष्टक योग’
षडाष्टक योग म्हणजे दोन ग्रह जेव्हा एकमेकांपासून सहाव्या किंवा आठव्या स्थानावर असतात तेव्हा तो योग निर्माण होतो. हे योग विशेषतः संघर्ष, अपयश, आर्थिक नुकसान आणि नातेसंबंधात तणाव निर्माण करतात. विशेषतः शनी आणि मंगळाच्या षडाष्टक योगामुळे अनेक राशींना कठीण काळाचा सामना करावा लागू शकतो. हा योग ज्या लोकांच्या राशीशी निगडित असेल, त्यांच्या आयुष्यात अचानक अडथळे, कामात अडचणी, नातेसंबंधातील वाद किंवा अपघाती प्रसंग घडू शकतात.

मेष राशी
मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ खूपच सावधगिरीचा आहे. आर्थिक स्थिती डळमळीत राहण्याची शक्यता आहे आणि वैवाहिक आयुष्यात सुद्धा मतभेद वाढू शकतात. तसेच, शत्रूंनी नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करू शकतो. अशा काळात भगवान शिवाची पूजा केल्याने मनाला स्थैर्य मिळू शकते.
मिथुन राशी
मिथुन राशीसाठी कौटुंबिक वातावरण तापट होण्याची शक्यता आहे. पैशाच्या बाबतीत तणाव वाढू शकतो आणि आरोग्यही डळमळीत राहू शकते. अशा स्थितीत दररोज हनुमान चालीसा म्हणणे मनाला शांतता देईल.
कन्या राशी
कन्या राशीच्या जातकांना पती-पत्नीमध्ये मानसिक तणाव आणि गैरसमज निर्माण होऊ शकतो. प्रवास करताना किंवा गाडी चालवताना अपघाताची शक्यता असल्यामुळे अधिक काळजी घेणं आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी सुद्धा चुका होण्याची शक्यता आहे. हनुमान मंदिरात दान केल्याने त्रास कमी होऊ शकतो.
वृश्चिक राशी
वृश्चिक राशीच्या लोकांनी कामाच्या ठिकाणी अतिशय संयमाने वागावं लागेल. ऑफिसमधील तणावामुळे मानसिक त्रास वाढू शकतो. वैवाहिक जीवनातही खटके उडू शकतात. त्यामुळे संवाद आणि संयम या दोन्हींची गरज आहे.
कुंभ राशी
कुंभ राशीच्या लोकांना आरोग्याच्या समस्या त्रासदायक ठरू शकतात. काहींना अचानक आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कोणालाही उधार पैसे देताना शंभर वेळा विचार करा. ऑफिसमध्ये चुकीच्या निर्णयांमुळे समस्या उद्भवू शकतात.
या सर्व राशींनी या काळात आध्यात्मिकता आणि संयमाचा मार्ग स्वीकारणे गरजेचे आहे. जेणेकरून या कठीण काळावर मात करता येईल. देवपूजा, दानधर्म आणि आत्मचिंतन हे त्रासाच्या काळात उपयोगी ठरू शकते.