रीच्या रथयात्रेचा गजर आणि भाविकांच्या ओसंडून वाहणाऱ्या भक्तीचा महापूर हे दरवर्षीचे दृश्य कित्येक श्रद्धाळूंच्या मनात कायम घर करून राहिलं आहे. पण यावर्षीच्या यात्रेला एक खास रंग लाभला आहे , तो म्हणजे भगवान जगन्नाथाची काही राशींवरील विशेष कृपा. असे म्हटले जाते की काही विशिष्ट राशी या भगवंताच्या अधिकच प्रिय आहेत. रथयात्रेच्या काळात त्यांच्या जीवनात समृद्धी, यश आणि आध्यात्मिक समाधान सहजतेने येते.

भगवान जगन्नाथ हे केवळ पुरीचे राजाधिराज नाहीत, तर करोडो लोकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहेत. रथयात्रेत ते स्वतः मंदिराबाहेर येतात, आपल्या भक्तांना दर्शन देतात, त्यांच्या आयुष्यात प्रेम आणि संरक्षणाचा वर्षाव करतात. हा एक असा प्रसंग असतो, जेव्हा देव स्वतः पुढाकार घेऊन भक्तांशी नातं जोडतात. अशाच प्रेमळ देवाला कोणत्या राशीचे लोक अधिक प्रिय असतील, याबद्दल अनेक ज्योतिषांनी वेळोवेळी संकेत दिले आहेत.
कर्क राशी
कर्क राशीचे लोक, आपल्या भावनाशील स्वभावासाठी ओळखले जातात. या राशीच्या लोकांना देवावर अपार श्रद्धा असते आणि ते आपल्या अंतरात्म्याने भक्ती करतात. हेच बहुधा कारण असावं की भगवान जगन्नाथ यांचं हृदय या भावनांनी भरलेल्या भक्तांनी जिंकलेलं असतं. त्यांच्या जीवनात सतत काही ना काही सकारात्मक घडतं, जणू देव त्यांच्या पाठीशी आहेत, असं वाटतं.
तूळ राशी
तूळ राशीच्या लोकांना सौंदर्य, समतोल आणि नातेसंबंध यांचं महत्त्व असतं. त्यांच्या जीवनात सुसंवादाची आणि सौहार्दाची भावना असते. आणि जेथे समजूतदारपणा आणि सौम्यपणा आहे, तिथेच देवताही सहजपणे स्थायिक होतात, असं म्हटलं जातं. त्यामुळे भगवान जगन्नाथ आपला आशीर्वाद देऊन त्यांना यश आणि प्रतिष्ठा देतात.
सिंह राशी
सिंह राशीचे लोक सत्त्वशील आणि आत्मविश्वासू असतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक नैसर्गिक तेज असतो. असे लोक जेव्हा भगवंताच्या चरणी नतमस्तक होतात, तेव्हा देव त्यांना विशेष कृपाशीर्वाद देतात. त्यांच्या आयुष्यातील अनेक अडथळे सहज दूर होतात. करिअरमध्ये यश, समाजात प्रतिष्ठा आणि नातेसंबंधांत संतुलन या सर्व गोष्टी त्यांच्यासोबत येतात.
असे मानले जाते की भगवान जगन्नाथ आपल्या भक्तांच्या भावना समजून घेतात. त्यांच्या श्रद्धेचा स्वीकार करतात, मग ती कोणत्याही जाती-धर्माची असो किंवा कोणत्याही राशीची. पण काही विशिष्ट राशींशी त्यांचे एक विलक्षण भावनिक नातं जुळलेलं आहे, ज्यामुळे या लोकांच्या आयुष्यात अनोखी उर्जा आणि आशिर्वादाची सतत अनुभूती होते.