घाईत निघालात आणि अचानक लक्षात आलं की ड्रायव्हिंग लायसन्स घरीच राहिलंय? मग काय, पोलिसांनी थांबवलं तर दंडाची चिंता सतावते. पण आता काळ बदललाय. भारत सरकारने वाहनधारकांसाठी एक स्मार्ट पर्याय खुला केला आहे, जो केवळ तुम्हाला दंडापासून वाचवणार नाही, तर तुम्हाला कागदपत्रांची फाईल घेऊन फिरण्याच्या त्रासातूनही मुक्त करेल. हा उपाय तुमच्याच मोबाईलमध्ये लपलेला आहे आणि तो 90% लोकांना अजूनही माहित नाही.

डिजी-लॉकर आणि mParivahan
डिजी-लॉकर आणि mParivahan हे दोन अधिकृत सरकारी अॅप्स आता तुमच्या वाहनाच्या कागदपत्रांसाठी ‘डिजिटल घर’ बनले आहेत. यात तुम्ही तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी प्रमाणपत्र (RC), प्रदूषण प्रमाणपत्र (PUC), विमा आणि इतर आवश्यक डॉक्युमेंट्स सहज सेव्ह करू शकता. हे अॅप्स केवळ डॉक्युमेंट दाखवण्यासाठी नाहीत, तर ते अधिकृतपणे वैध मानले जातात. म्हणजेच, तुम्ही मोबाईलवरूनच पोलिसांना डिजिटल कागदपत्रं दाखवलं, तरी चालेल त्यांना ते स्वीकारणं बंधनकारक आहे.
डिजीलॉकर अॅप कसं वापरावं?
डिजीलॉकरमध्ये लायसन्स सेव्ह करायला फारसे काही लागणार नाही. अॅप इंस्टॉल करा, मोबाईल क्रमांक आणि आधार वापरून लॉगिन करा. मग ‘Get Issued Documents’ वर जा आणि ‘Driving Licence’ निवडा. एकदा का लायसन्स डाउनलोड केलं की, ते कायम अॅपमध्ये सेव्ह राहील. त्याचप्रमाणे, mParivahan अॅपमध्येही DL आणि RC सहज पाहता येतात. QR कोडद्वारेही तुम्ही कागदपत्रं शेअर करू शकता, आणि तुम्ही वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणी करणाऱ्यांसमोर ते अधिकृतपणे सादर करू शकता.
2018 पासून सरकारने हे स्पष्टपणे सांगितलं आहे की डिजिटल फॉर्ममधील कागदपत्रं देखील मोटार वाहन कायद्यानुसार वैध आहेत. त्यामुळे आता फिजिकल लायसन्स विसरल्यावरही काळजीचं कारण उरत नाही. उलट, जर ही माहिती नसल्यामुळे तुम्ही प्रत्यक्ष कागदपत्र नसेल दाखवू शकलात, तर ₹5,000 पर्यंतचा दंडही आकारला जाऊ शकतो.
हे डिजिटल अॅप्स तुम्हाला फक्त दंडापासून वाचवत नाहीत, तर तुमचं कामही खूप सोपं करतात. आजच्या धकाधकीच्या जीवनात पुन्हा पुन्हा कागदपत्रं शोधणं, त्यांची काळजी घेणं हे सर्व त्रासदायक ठरू शकतं. यावरचा उपाय तुमच्या मोबाईलमध्ये आहे. एकदा का लायसन्स आणि इतर कागदपत्रं या अॅप्समध्ये सेव्ह केली, की मग तुम्ही कुठेही, केव्हाही, कोणालाही ते सहज दाखवू शकता.