अलास्काच्या आखातात घडणारी ‘ही’ नैसर्गिक जादू पाहून वैज्ञानिकही थक्क, आयुष्यात एकदा तरी हे दृश्य बघावंच!

Published on -

जगात अशा काही निसर्ग घटना आहेत, ज्या पाहून माणूस थक्क होतो, अवाक् होतो. विज्ञान त्यांचं स्पष्टीकरण देतं, पण तरीही त्या दृश्यांचा अनुभव म्हणजे एक अद्वितीय चमत्कार वाटतो. अशीच एक घटना घडते पृथ्वीच्या दोन महान महासागरांच्या संगमावर, जिथे दोन पाण्याचे प्रवाह एकमेकांना भिडतात, पण विलक्षण गोष्ट म्हणजे, ते एकमेकांमध्ये मिसळतच नाहीत. हे दृश्य इतकं अद्भुत आहे की ते पाहणाऱ्याला क्षणभर देवाचं अस्तित्व जाणवून देतं.

हिंदी आणि प्रशांत महासागर

 

 

हिंदी महासागर आणि प्रशांत महासागर अलास्काच्या आखातात एकमेकांना भिडतात, पण त्यांच्या पाण्यात विलक्षण फरक आहे. एका बाजूला खोल निळसर रंग, तर दुसऱ्या बाजूला फिकट हिरवट छटा आणि हे दोन्ही पाणी एकमेकांच्या सीमारेषेवरच थांबतं. जणू निसर्गाने त्यांच्यामध्ये एक अदृश्य भिंत उभी केली आहे, ज्यामुळे ते एकत्र येऊनही स्वतंत्र राहतात. हे दृश्य डोळ्यांनी पाहणं म्हणजे एखाद्या स्वप्नवत जगात प्रवेश केल्यासारखं आहे.

वैज्ञानिक कारण काय?

या घटनेमागचं विज्ञान शोधायचा प्रयत्न शास्त्रज्ञांनी अनेक वर्ष केला आहे. त्यांच्या मतानुसार, या दोन महासागरांमध्ये क्षारता, तापमान आणि घनता यामध्ये मोठा फरक आहे. या तिन्ही गोष्टींच्या असमतोलामुळे या दोन पाण्याचे प्रवाह एकत्र येताना मिसळत नाहीत. त्यांच्यामध्ये एक सीमारेषा तयार होते, जिथे फेसासारखी एक हलकी भिंत दिसते. ही भिंत खऱ्या अर्थाने पाणी वेगळं ठेवत नाही, पण त्याच्या घनता-तापमानाच्या फरकामुळे त्या ठिकाणी एक अपारदर्शक सीमारेषा तयार होते.

याशिवाय, सूर्यप्रकाश पाण्यावर पडताना ते कशा प्रकारे परावर्तित होतं यावरही या रंगांच्या फरकाचा प्रभाव असतो. जास्त क्षार असलेलं पाणी सूर्यकिरणांना वेगळं प्रतिबिंबित करतं, तर कमी क्षार असलेलं पाणी वेगळं. यामुळे दोन्ही महासागरांची छटा एकमेकांपेक्षा पूर्णतः वेगळी भासत असते.

मात्र इतकं सगळं विज्ञान समजावून घेतल्यानंतरही, हे दृश्य पाहताना मनात एक भीती आणि कुतूहलता दोन्ही येते. हे निसर्गाचं अद्भुत रूप खरंच विज्ञानाच्या कक्षेबाहेरचं नाही का? अनेक लोक या दृश्याला धार्मिकतेशी जोडतात आणि म्हणतात की हे फक्त देवाचंच काम असू शकतं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!