जगाच्या 25% GDP इतकी संपत्ती, वार्षिक महसूल ऐकून आजची अमेरिकाही हादरेल! कोण होता भारतीय इतिहासातील सर्वात श्रीमंत राजा?

Published on -

एका काळी संपूर्ण जग भारताकडे आशेने पाहायचं, कारण इथली संपत्ती, इथली संस्कृती आणि इथली समृद्धी जगात सर्वाधिक मानली जायची. त्या समृद्धीच्या शिखरावर जेव्हा भारत पोहोचला होता, तेव्हा या वैभवाच्या केंद्रस्थानी होता मुघल सम्राट अकबर! तो केवळ पराक्रमी शासक नव्हता, तर अशा आर्थिक सामर्थ्याचा अधिपती होता की त्याच्या काळात भारत जगाच्या एकूण जीडीपीच्या तब्बल 25% वाटा घेत होता. ही गोष्ट आज ऐकताना अविश्वसनीय वाटते, पण तीच खरी आहे.

 

मुघल सम्राट अकबरचा काळ

अकबरचं साम्राज्य म्हणजे सुवर्णकाळ. तो एक दूरदृष्टी असलेला प्रशासक होता. त्याने ज्या पद्धतीने करव्यवस्था उभी केली होती, ती केवळ महसूल गोळा करण्यापुरती मर्यादित नव्हती, तर शेतकऱ्यांपासून व्यापार्‍यांपर्यंत प्रत्येक घटकाला जोडणारी होती. जमीन महसूल म्हणजे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाच्या जवळपास निम्मा भाग आणि तो सरकारकडे सुव्यवस्थित पोहोचायचा. यामुळे सम्राटाच्या तिजोरीत सोनं, मौल्यवान वस्त्रं यांचा खच असायचा.

पण इतक्यावरच तो थांबला नाही. अकबरने व्यापार मार्गांचा विकास केला. देशांतर्गत रस्त्यांचं आणि वाहतुकीचं जाळं उभं केलं. नाण्यांची एकसंधता आणली. परिणामी भारताचं व्यापारी सामर्थ्य प्रचंड वाढलं. देशाच्या कानाकोपऱ्यात उत्पादन झपाट्याने वाढू लागलं, विशेषतः बंगाल उपखंडात. इथलं कापड, जहाजबांधणीचं कौशल्य आणि हस्तकला परदेशातही प्रसिद्ध झाली.

 

1700 च्या दशकात भारताची जागतिक उत्पादनात सुमारे 25% भागीदारी होती. याच काळात संपूर्ण युरोप अजून औद्योगिक क्रांतीची पावलं टाकत होता, आणि चीनदेखील राजकीय संक्रमणात होता. अशा काळात भारत मात्र जागतिक व्यापारात आघाडीवर होता.

अकबराच्या काळातील वार्षिक महसूल

अकबरच्या राजवटीत भारताचा वार्षिक महसूल जवळपास $90 दशलक्ष डॉलर्स इतका होता. हे एका सम्राटासाठी नाही, तर संपूर्ण आधुनिक युरोपीय राष्ट्रांसाठीही अतुलनीय होतं. ग्रोनिंगेन विद्यापीठाच्या अभ्यासानुसार, भारताची दरडोई जीडीपी फ्रान्स, जर्मनी, जपान आणि अमेरिकेपेक्षा जास्त होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!