स्वप्नात एक्स गर्लफ्रेंड आली ? स्वप्नशास्त्र काय सांगतं ते वाचून बसेल धक्का

Published on -

कधी कधी रात्री झोपेत एखादं असं स्वप्न पडतं, जे आपल्याला सकाळपर्यंत विचारात टाकून जातं. विशेषतः जेव्हा त्या स्वप्नात आपला माजी प्रियकर किंवा प्रेयसी दिसते, तेव्हा मन अधिकच गोंधळून जातं.

“अरे, एवढ्या वर्षांनी हे काय स्वप्न पडलं?” असं वाटून जातं. पण असं स्वप्न का पडतं? त्याचा काही अर्थ असतो का? स्वप्नशास्त्र या सगळ्याचं एक वेगळंच उत्तर देतं.

जेव्हा आपल्याला स्वप्नात माजी प्रेयसी दिसते, तेव्हा त्याचा अर्थ असा असू शकतो की आपण अजूनही तिच्या आठवणीत कुठे तरी अडकलेलो आहोत.

त्या वेळचा एखादा क्षण, एखादा संवाद तो अजूनही आपल्या मनात रेंगाळतोय. कधी ती व्यक्ती खूप खास वाटलेली असते, पण वेळेअभावी किंवा परिस्थितीमुळे नातं तुटलेलं असतं. पण मन मात्र लगेच विसरत नाही. आणि म्हणूनच त्या आठवणी स्वप्नातून परत येतात.

कधी कधी हे स्वप्न फक्त जुना काळ आठवतोय असं असतं. पण जर त्या व्यक्तीला आपण स्वप्नात रडताना, रागावलेली पाहिलं, तर त्याचा अर्थ असा असतो की काही भावना अजूनही मनात खोलवर दडलेल्या आहेत. कदाचित काही गोष्टी बोलायच्या राहिलेल्या असतात.

तसंच, जर सध्याची जोडीदार पत्नी किंवा मैत्रीण स्वप्नात आली आणि ती हसत-खेळत होती, तर ते तुमच्या नात्यात सुख, समाधान आहे याचं संकेत असू शकतं. पण जर ती नाराज, रडत किंवा उदास दिसली, तर ते तुमच्या नात्याबाबत मनात काही चिंता आहे याची कल्पना देतं.

म्हणजे स्वप्नं फक्त कल्पनाच नसतात ती मनातल्या भावना वेगळ्या भाषेत बोलत असतात. म्हणूनच अशा स्वप्नांकडे दुर्लक्ष करू नका, पण त्यांचा अर्थ लावून स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करा. कधी ती फक्त आठवण असते, तर कधी ती आपल्याला काही सांगायचा एक मार्ग असतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!