धमाका ऑफर! 8 हजारांपेक्षाही कमी किंमतीत मिळताय दमदार 5G फोन, पाहा यादी

Published on -

कधीकाळी 5G फोन म्हणजे फक्त हाय-एंड युजर्ससाठी असलेली लक्झरी वाटायची. पण आता तंत्रज्ञान इतकं सर्वसामान्य झालं आहे की, अगदी ₹8,000 पेक्षाही कमी बजेटमध्येही तुम्ही 5G कनेक्टिव्हिटी असलेला स्मार्टफोन सहज खरेदी करू शकता. सॅमसंगपासून ते रेडमी, लावा आणि टेकनोपर्यंत अनेक कंपन्या या श्रेणीत स्पर्धा करत आहेत. आज आपण अशाच काही उत्कृष्ट आणि परवडणाऱ्या 5G फोनबद्दल जाणून घेणार आहोत, जे फक्त किंमतीच्या बाबतीतच नव्हे तर फिचर्समध्येही धडाकेबाज आहेत.

गॅलेक्सी M06 5G

सॅमसंगने बजेट सेगमेंटमध्ये गॅलेक्सी M06 5G सादर करून मोठी चाल खेळली आहे. फक्त ₹7,999 मध्ये मिळणारा हा फोन 6.7 इंचाच्या HD+ डिस्प्ले, MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर, 50MP ड्युअल रिअर कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरीसह येतो. शिवाय, 25W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असल्याने तो परफॉर्मन्समध्येही बेस्ट ठरतो.

रेडमी A4 5G

याच रांगेत रेडमी A4 5G देखील आपल्या वैशिष्ट्यांमुळे लक्ष वेधून घेतो. 6.88 इंचाचा 120Hz डिस्प्ले, Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसर, 50MP रिअर कॅमेरा आणि 5,160mAh ची दमदार बॅटरी हे सगळं फक्त ₹7,999 मध्ये मिळणं ही चांगली डील मानली जाते.

Storm Lite 5G

लावाने देखील आपला Storm Lite 5G फोन आकर्षक किंमतीत आणला आहे. या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.75 इंचाचा HD+ डिस्प्ले आहे, तर Dimensity 6400 प्रोसेसर आणि 5,000mAh बॅटरीसह 15W फास्ट चार्जिंगचा सपोर्टदेखील दिला आहे. याचं आकर्षण म्हणजे 50MP रिअर कॅमेरा आणि स्वस्त किंमत. हा फोन तुम्हाला फक्त ₹7,999 मध्ये मिळेल.

टेकनो Pop 9 5G

टेकनोने देखील Pop 9 5G या मॉडेलद्वारे बजेट सेगमेंटमध्ये एक चांगला पर्याय दिला आहे. 6.67 इंचाचा 120Hz डिस्प्ले, Dimensity 6300 प्रोसेसर, 48MP रिअर कॅमेरा आणि 5,000mAh बॅटरी हे या फोनचे प्रमुख प्लस पॉइंट्स आहेत. त्याची किंमतही ₹7,999 आहे.

Lava Shark 5G

शेवटी लावाचा आणखी एक फोन Lava Shark 5G हाही यादीत आपली जागा मिळवतो. यामध्ये Unisoc T765 प्रोसेसर, Android 15 सपोर्ट, 13MP रिअर कॅमेरा, 5,000mAh बॅटरी आणि 18W चार्जिंग अशा वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!