शेतकऱ्यांनो PM किसानचे ₹2000 रुपये पाहिजे असतील, तर आत्ताच ‘ही’ कामे करून घ्या! अन्यथा खात्यात 20 वा हप्ता जमा होणार नाही

Published on -

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना म्हणजे देशातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा देणारी आर्थिक मदतीची योजना. पण या योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळतो? आणि 20 वा हप्ता खरोखरच खात्यावर जमा होणार आहे का? हे जाणून घेणं अनेक शेतकऱ्यांसाठी आज गरजेचं आहे. घरात बसून केवळ काही क्लिकमध्ये तुम्ही हे तपासू शकता, पण त्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील.

या योजनेअंतर्गत दरवर्षी 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 3 समान हप्त्यांमध्ये पाठवले जातात. मागील 19 हप्ते अनेकांनी यशस्वीरीत्या मिळवले आहेत आणि आता सगळ्यांच्या नजरा 20 व्या हप्त्याकडे लागल्या आहेत. जूनमध्ये या हप्त्याचे पैसे येतील अशी अपेक्षा होती, पण तरीही केंद्र सरकारकडून अंतिम तारीख जाहीर झालेली नाही. आता ही रक्कम जुलै अखेरपर्यंत खात्यात जमा होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

योजनेची पात्रता

पण , जर तुम्ही काही महत्त्वाची कामं पूर्ण केली नसेल, तर हे 2,000 रुपये तुम्हाला मिळणार नाहीत. सर्वप्रथम, तुम्ही पात्र शेतकरी असला पाहिजे, म्हणजे तुमच्याकडे शेतीची वैध जमीन हवी आणि तुमचं नाव कुटुंब युनिटमध्ये पती, पत्नी किंवा अल्पवयीन मुलांपैकी एक म्हणून असणं आवश्यक आहे. पण सरकारी अधिकारी, निवृत्त कर्मचाऱ्यांचे कुटुंब, डॉक्टर, इंजिनीयर, वकील किंवा इन्कम टॅक्स भरणारे व्यक्ती या योजनेसाठी पात्र नाहीत.

ई-केवायसी आवश्यक

तुमच्या कागदपत्रांमध्ये जर बँक खात्याचा तपशील चुकलाय, किंवा आधारशी लिंक नसेल, ई-केवायसी अपूर्ण असेल, तर तुमचे पैसे अडकू शकतात. त्यामुळे https://pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुमची स्थिती तपासणं अत्यंत गरजेचं आहे. इथे ‘लाभार्थी यादी’ या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमचं नाव शोधू शकता. यासाठी राज्य, जिल्हा, तालुका, ब्लॉक आणि गाव यांची निवड करावी लागते.

हेल्पलाइन क्रमांक

जर तुमचं नाव यादीत सापडलं, तर समजून घ्या की तुम्हाला हप्ता मिळणार आहे. पण जर नाव दिसलं नाही, आणि तुम्हाला वाटतं की तुम्ही सर्व अटी पूर्ण केल्या आहेत, तर चिंता करू नका. तुम्ही [email protected] या ईमेलवर संपर्क करू शकता किंवा 011-23381092 या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करू शकता. ही सेवा 24×7 उपलब्ध आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!