88 मुलांचे वडील, 44 रोल्स रॉयस आणि पटियाला पेग…, पटियालाच्या महाराजांचे आलीशान जीवन पाहून ब्रिटिशही थक्क झाले!

Published on -

जेव्हा आपण राजांची गोष्ट करतो, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर एखादा डौलदार दरबार, रेशमी वस्त्रे आणि हिरेजडित मुकुट डोळ्यांसमोर उभा राहतो. पण भारतात एखादा राजा विलासी आयुष्याचा मूर्तिमंत अवतार होता, तर तो म्हणजे पटियाळाचे महाराज भूपिंदर सिंह. त्यांचं व्यक्तिमत्त्व केवळ त्यांच्या सत्तेपुरतं मर्यादित नव्हतं, तर ते त्यांच्या आयुष्य जगण्याच्या भव्यतेतही झळकत होतं. इतकं की त्यांना पाहून ब्रिटिश अधिकाऱ्यांच्याही भुवया उंचावल्या.

महाराज भूपिंदर सिंह

महाराज भूपिंदर सिंह यांच्याबद्दल अनेक अशा गोष्टी सांगितल्या जातात ज्या आज ऐकताना भासावं की जणू एखाद्या सिनेमाची गोष्ट आहे. त्यांचे जेवणावरील प्रेम इतके जबरदस्त होते की ते एकटे 5 लोकांइतकं जेवू शकत. एकदा एका ब्रिटिश अधिकाऱ्याने त्यांच्यासोबत बसून जेवताना हे दृश्य पाहिलं आणि अक्षरशः थक्क झाला. त्यांच्या समोर 15 प्रकारचे पराठे, कबाब आणि पटियाला पेगचे मोठे गिलास वाढले जात होते. जेवताना त्यांचं ते तावातावानं जेवणं पाहून तो अधिकारी म्हणाला, “महाराजांसारखं खाणं म्हणजे ही एक युद्धाची तयारी आहे!”

महाराजांची शारीरिक ठेवणसुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्त्वासारखीच भव्य होती. त्यांची उंची 6 फूट 4 इंच, आणि वजन जवळपास 136 किलो. जन्म 12 ऑक्टोबर 1891 रोजी झाला. वडील राजिंदर सिंह यांच्या निधनानंतर अवघ्या 9 व्या वर्षी त्यांनी गादीची सूत्रं सांभाळली. बालपणात त्यांना ‘टिक्का साहेब’ म्हणत असत. जणू लहानपणापासूनच भविष्याच्या राजाची छाप दिसायला लागली होती.

भारतीय क्रिकेटचेही केले नेतृत्व

त्यांचं आयुष्य केवळ सत्ता, संपत्ती आणि खानदानी शोभेपुरतं मर्यादित नव्हतं. भूपिंदर सिंह हे संगीतप्रेमी, कलेचे अभिरस संपन्न जाणकार, आणि खेळाडू होते. भारतातील क्रिकेट इतिहासात त्यांचं स्थान अत्यंत मानाचं आहे. 1911 साली त्यांनी भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व करत इंग्लंड दौरा केला आणि 1915 ते 1937 या काळात अनेक प्रथम श्रेणी सामनेही खेळले. आज ‘पटियाला पेग’ म्हणून ओळखला जाणारा व्हिस्कीचा विशेष मोठा पेगही त्यांच्या नावानेच प्रचलित झाला आहे.

स्वतःचं खाजगी विमान आणि…

 

इतिहासकार डोमिनिक लॅपियर आणि लॅरी कॉलिन्स यांनी ‘फ्रीडम अ‍ॅट मिडनाईट’ या पुस्तकात लिहिलं आहे की महाराजांसाठी चहा पिताना दोन कोंबड्या खाणं ही एक अगदी नेहमीची बाब होती. त्यांचे तबेले जगातील सर्वोत्तम घोड्यांनी भरलेले होते, आणि त्यांचा दरबार तो तर ऐश्वर्याचा एक जिवंत इतिहास होता. एवढंच नाही, तर त्यांच्या विलासितेचा परमोच्च टप्पा म्हणजे त्यांचा 350 स्त्रियांचा हरेम.

भूपिंदर सिंह यांच्याकडे स्वतःचं खाजगी विमान होतं. त्याकाळी, जेव्हा विमानं ही केवळ काही महत्त्वाच्या व्यक्तींसाठीच असायची. इतकंच नव्हे तर, त्यांच्याकडे तब्बल 44 रोल्स रॉयस कार्स देखील होत्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!