फ्लिपकार्ट GOAT सेलमध्ये धमाका! Samsung ते Motorola…, 50MP कॅमेरासह टॉप-5 स्मार्टफोन अवघ्या ₹8000 मध्ये

Published on -

जर तुम्ही कमी बजेटमध्ये दमदार फीचर्स असलेला स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर सध्या सुरू असलेल्या Flipkart GOAT सेलमुळे तुमच्यासाठी एक मोठी संधी चालून आली आहे. अवघ्या 8,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत Samsung, Motorola, Redmi, Poco आणि Realme सारख्या लोकप्रिय ब्रँड्सचे स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे हे फोन केवळ किमतीतच नव्हे, तर फीचर्सच्या बाबतीतही जबरदस्त आहेत. 50MP कॅमेरा, 6,300mAh बॅटरी, 12GB पर्यंत रॅमसारखी वैशिष्ट्ये अगदी एंट्री-लेव्हल रेंजमध्ये मिळत आहेत.

Motorola G05

या सेलमध्ये उपलब्ध असलेल्या टॉप 5 फोनमध्ये Motorola G05, Redmi A5, Realme C71, Poco C75 5G आणि Samsung Galaxy F06 5G यांचा समावेश आहे. या सगळ्याच फोनमध्ये HD+ डिस्प्ले, चांगली बॅटरी क्षमता आणि आजच्या काळात आवश्यक असलेली फास्ट प्रोसेसिंग पॉवर मिळते. Motorola G05 हा फोन त्याच्या स्टॉक अँड्रॉइड अनुभवामुळे लक्ष वेधून घेतो. यामध्ये 12GB रॅम आणि 50MP मुख्य कॅमेरा असून किंमत फक्त 7,299 रुपये आहे. फोटोग्राफी आणि मल्टीटास्किंग दोन्हींसाठी हा फोन भरपूर उपयुक्त आहे.

Realme C71

Realme C71 देखील एक मजबूत पर्याय आहे. यात 6,300mAh क्षमतेची मोठी बॅटरी आहे, जी दिवसभर वापरानंतरही टिकते. 6.67 इंचाचा मोठा स्क्रीन आणि 24GB पर्यंत विस्तारित रॅममुळे गेमिंग आणि व्हिडिओ पाहण्याचा अनुभव अधिक समृद्ध होतो. याची किंमत 7,699 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे, जे या फीचर्ससाठी नक्कीच वाजवी वाटते.

Poco C75 5G

जर तुम्हाला 5G फोन हवा असेल, तर Poco C75 5G हा तुमच्यासाठी परिपूर्ण पर्याय ठरू शकतो. यात Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसरसह 120Hz चा रिफ्रेश रेट असलेला 6.88 इंचाचा डिस्प्ले आहे. 50MP ड्युअल कॅमेरा आणि 5MP फ्रंट कॅमेरा यामुळे फोटोग्राफीही चांगली होते. किंमत आहे 7,699 रुपये.

Redmi A5

Redmi A5 हा फोन एक सोपा पण मजबूत पर्याय आहे, जो नवख्या वापरकर्त्यांसाठी खास डिझाइन करण्यात आला आहे. यात 6.71 इंचाचा HD+ डिस्प्ले, Android 13 Go Edition आणि 8GB पर्यंत रॅम आहे. किंमत फक्त 7,499 रुपये असून, हा फोन दैनंदिन वापरासाठी उत्तम आहे.

Galaxy F06 5G

यादीतील शेवटचा आणि सर्वात विश्वासार्ह ब्रँड म्हणजे Samsung. Galaxy F06 5G हा फोन 5G कनेक्टिव्हिटीसह 6.6 इंचाचा HD+ PLS LCD डिस्प्ले, MediaTek Dimensity 6100+ प्रोसेसर आणि 5,000mAh बॅटरीसह येतो. 50MP मुख्य कॅमेरा आणि 25W फास्ट चार्जिंग हे त्याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. हा फोन सध्या 7,999 रुपयांना उपलब्ध आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!