आज आपण फोनमध्ये 108 मेगापिक्सेल कॅमेरे, 4K व्हिडीओ शूटिंग, एआय पोर्ट्रेट मोड यांसारखी वैशिष्ट्ये अगदी सहज पाहतो. पण एक काळ असा होता, जेव्हा केवळ कॉल करणे आणि मेसेज पाठवणे हीच मोबाईलची मजल होती. त्या काळात एका फोनने इतिहास घडवला, तो म्हणजे Nokia 7650 भारतातील पहिला कॅमेरा फोन. आज आपण सहजपणे 20,000 रुपयांत मस्त 5G फोन घेतो, पण एकेकाळी या फोनची किंमत एवढी होती की ती ऐकून आजही तुम्हाला धक्का बसेल.

Nokia 7650 ची किंमत
सन 2002 मध्ये, नोकियाने भारतीय बाजारात एक तांत्रिक क्रांती घडवणारा फोन सादर केला. Nokia 7650 हे नाव ऐकताच जुन्या आठवणी जाग्या होतात. त्यात 0.3 मेगापिक्सेलचा व्हीजीए कॅमेरा होता, जो त्या काळात क्रांतिकारी मानला जात होता. फोनमधून फोटो काढता येतो, हेच लोकांसाठी मोठं आश्चर्य होतं. पहिल्यांदाच लोकांना फोनच्या स्क्रीनवर त्यांचा फोटो पाहता येत होता, हे एक प्रकारचं जादूच वाटत होतं.
त्यावेळी या फोनची किंमत सुमारे €600 म्हणजेच आजच्या हिशोबाने सुमारे ₹60,000 इतकी होती. त्या काळात इतका महागडा फोन घेणे हे फक्त श्रीमंत किंवा तंत्रज्ञानाच्या प्रेमात पडलेल्या लोकांचे काम होते. आज त्या किमतीत तुम्ही सहजपणे 2 ते 3 उत्तम 5G स्मार्टफोन्स खरेदी करू शकता. पण तेव्हा Nokia 7650 हे केवळ फोन नव्हते, ते एक स्टेटस सिम्बॉल होते.
Nokia 7650 की वैशिष्ट्ये
फोनमध्ये 2.1-इंचाची TFT स्क्रीन होती, ज्याचं रिझोल्यूशन 176×208 पिक्सेल इतकं होतं. त्यात 4MB इंटरनल मेमरी होती आणि कार्ड स्लॉटची सुविधा नव्हती. आजच्या TB मेमरी कार्डांच्या काळात हे हास्यास्पद वाटेल, पण त्या वेळेला हेही खूप काही होतं. तसेच, ब्लूटूथ आणि इन्फ्रारेड सारखी कनेक्टिव्हिटीही त्यात होती, जी त्या काळात अगदी ‘फ्युचरिस्टिक’ वाटायची.
या फोनचा प्रभाव भारतीय वापरकर्त्यांवर खूप मोठा होता. नुसत्या संवादासाठीच नव्हे, तर जीवनशैली बदलणाऱ्या गॅझेट्समध्ये मोबाईल फोन सामील झाला. तरुण वर्ग, विशेषतः नवे तंत्रज्ञान स्वीकारायला उत्सुक असलेले लोक Nokia 7650 वर फिदा झाले.
आज जरी हा फोन बाजारातून अदृश्य झाला असला, तरी भारतीय टेक जगतात तो कायमचा इतिहासात नोंदलेला आहे. Nokia 7650 म्हणजे भारतात मोबाईल फोटोग्राफीचा सुरुवातीचा अध्याय मानला जातो.