बाथरूम स्वच्छ ठेवणं हे प्रत्येक घरातलं एक न दिसणारं पण अत्यंत महत्त्वाचं काम आहे. टॉयलेट सीटवरील पिवळसर आणि हट्टी डाग पाहून जर तुम्हालाही वैताग आला असेल, तर तुम्ही एकटे नाही. ही समस्या बहुतांश घरांमध्ये सामान्यपणे दिसते. हे डाग मुख्यतः लघवीच्या थेंबांमुळे, पाण्यातील खनिजं साचल्यामुळे किंवा स्वच्छतेकडे थोडं दुर्लक्ष झाल्यानं निर्माण होतात. पण चांगली गोष्ट ही आहे की, ही डागं अगदी घरातील काही सोप्या पांढऱ्या पावडरने सहज घालवता येऊ शकतात.
बेकिंग सोडा

घरगुती उपाय म्हणून सर्वात आधी नाव घेतलं जातं ते बेकिंग सोडाचं. हे केवळ स्वयंपाकातच नव्हे तर घराच्या स्वच्छतेसाठीही जादुई ठरतं. बेकिंग सोडा थोडं टॉयलेट सीटवर शिंपडावं आणि ब्रशने घासून पाण्याने धुवावं. काही मिनिटांतच डाग हलके होऊ लागतात आणि सततच्या वापराने ते पूर्णपणे नाहीसे होतात.
लिंबू आणि मीठ
जर तुम्ही घरातच तयार केलेला उपाय शोधत असाल, तर लिंबू आणि मीठ हे एक उत्कृष्ट जोड आहे. लिंबाचा आंबट रस आणि मिठाचे रसायन मिळून एक नैसर्गिक पेस्ट तयार होते. ही पेस्ट डागांवर लावून 15-20 मिनिटं ठेवावी आणि नंतर स्क्रब केल्यास डाग आणि दुर्गंधी दोन्ही दूर होतात.
टॉयलेट क्लीनर
सप्ताहातून दोन वेळा चांगल्या टॉयलेट क्लीनरचा वापर केल्यास हट्टी डाग जमा होण्याची शक्यताच राहत नाही. याशिवाय पांढरा व्हिनेगर हे आणखी एक प्रभावी आणि स्वस्त उपाय आहे. अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असलेला व्हिनेगर स्प्रे बाटलीत भरून डागांवर फवारल्यावर आणि थोडा वेळ ठेवल्यावर सहजपणे डाग घासून काढता येतात.
बोरिक अॅसिड पावडर
रात्री झोपण्यापूर्वी बोरिक अॅसिड पावडर टॉयलेटवर शिंपडल्यास सकाळपर्यंत ती आपलं काम पार पाडते. सकाळी केवळ ब्रशने घासून टॉयलेट फ्लश केल्यावर त्याचा प्रभाव दिसून येतो. हाच परिणाम फिटकरी पावडरद्वारे देखील मिळवता येतो. अर्धा चमचा फिटकरी एका ग्लास पाण्यात मिसळून तयार केलेलं द्रावण टॉयलेट सीटवर ओतून काही वेळ ठेवलं तरी चांगला परिणाम मिळतो.