OTP विसरा, आता फेस आयडी व फिंगरप्रिंटने 3 सेकंदात होणार पेमेंट! देशातील ‘या’ एकमेव बँकेने सुरू केली भन्नाट डिजिटल सेवा!

Published on -

ऑनलाइन पेमेंट करताना दरवेळी येणारा ओटीपी उशिरा आल्याने किंवा न मिळाल्याने अनेकांचे व्यवहार अर्धवट राहून जातात. यामुळे वेळही वाया जातो, आणि एक संतापही निर्माण होतो. पण, आता यावर एक दिलसादायक मार्ग निघाला आहे. फेडरल बँकेने एक अशी प्रणाली सुरू केली आहे जिच्यामुळं ना ओटीपी लागणार, ना वेळ वाया जाणार. फक्त चेहरा दाखवून किंवा बोट ठेवून व्यवहार पूर्ण करता येतील.

फेडरल बँकेने सुरू केली सेवा

फेडरल बँकेने देशातील नावाजलेल्या फिनटेक कंपन्या एम2पी आणि मिंकासुपे यांच्या सहकार्याने एक आधुनिक बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन सोल्यूशन सादर केलं आहे. या नव्या प्रणालीचा उपयोग करून ग्राहक आता चेहरा (Face ID) किंवा फिंगरप्रिंटच्या साहाय्याने सहज आणि जलद पेमेंट करू शकणार आहेत. हे सिस्टिम केवळ व्यवहार सुलभ करण्यापुरतं मर्यादित नाही, तर ऑनलाईन व्यवहारांची सुरक्षितता अधिक घट्ट करणाऱ्या दिशेनेही एक मोठं पाऊल आहे.

अगोदर ओटीपीद्वारे व्यवहार करताना अनेक अडथळे येत. काही वेळा ओटीपी वेळेवर न मिळणं, मोबाईल नेटवर्क न मिळणं किंवा चुकीचा कोड टाकल्याने व्यवहार फसणं अशा समस्या सामान्य होत्या. आता या सगळ्याला पूर्णविराम देत बँकेने अत्याधुनिक बायोमेट्रिक मार्ग निवडला आहे. ग्राहकांची सोय आणि संरक्षण या दोन्ही बाबींचा विचार करूनच ही प्रणाली उभारण्यात आली आहे.

सुरक्षित आणि उपयोगी सेवा

फेडरल बँकेचं हे बायोमेट्रिक सोल्यूशन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या 2-घटक प्रमाणीकरण नियमांशी सुसंगत आहे. ग्राहक एकदाच आपली संमती दिल्यानंतर, त्यांना हे फिचर सर्व मान्यताप्राप्त अॅप्सवर वापरणं सहज शक्य होतं. म्हणजेच एकदा परवानगी दिली की, त्यानंतर प्रत्येक वेळी तुमचा बायोमेट्रिकच तुमचा डिजिटल स्वाक्षरी बनतो.

या प्रणालीचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक व्यवहार ग्राहकाच्या स्वतःच्या डिव्हाइसवरून खास आणि वेगळ्या पद्धतीने ओळखला जातो. म्हणजेच, कोणतीही थर्ड पार्टी इंटरफेरेन्स शक्य नाही. शिवाय, ग्राहकाला हव्या वेळी हे फिचर सुरु किंवा बंद करण्याची मुभा देखील आहे. आणि हो, जर बायोमेट्रिक काम करत नसेल, तर पारंपरिक ओटीपीचा पर्याय राखीव ठेवलेला आहे.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ही सुविधा अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही प्रकारच्या स्मार्टफोनवर सहज उपलब्ध आहे. यामुळे कोणताही तांत्रिक अडथळा न येता, फक्त 3 सेकंदात व्यवहार पूर्ण करणं शक्य झालं आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!