साधारणपणे बाजारात मिळणाऱ्या पदार्थांमध्ये “व्हेज”चा शिक्का दिसला की आपण निर्धास्त होतो. पण हीच बेफिकिरी आपल्या धार्मिक, वैयक्तिक आणि आरोग्यविषयक आस्थांवर पाणी फेरू शकते. कारण काही असे खाद्यपदार्थ आहेत, जे नावाने व्हेज असले तरी प्रत्यक्षात त्यात मांसाहारी घटक मिसळलेले असतात.
आजचा जमाना “लेबलचा”, पण प्रत्येक लेबल विश्वासार्ह असेलच असे नाही. बऱ्याच वेळा आपण शुद्ध शाकाहारी समजून काही पदार्थ खातो, आणि नंतर कळते की त्यात प्राणिजन्य घटक मिसळले होते. यामागे बऱ्याचदा उत्पादन प्रक्रियेत वापरले जाणारे घटक कारणीभूत असतात, जे सरळ डोळ्यांना दिसत नाहीत पण तरीही आपल्या आहाराचे स्वरूप बदलून टाकतात.

केक आणि पेस्ट्री
बेकरीमध्ये मिळणारे आकर्षक केक आणि पेस्ट्री तुमच्या वाढदिवसाचा आनंद द्विगुणित करतात, पण त्यातील अंडी हे त्याला मांसाहारी बनवते. अनेक ठिकाणी ‘एगलेस’ म्हणून वेगळा उल्लेख केला जातो, तो वाचल्याशिवाय खाताना सावधगिरी बाळगा.
फ्रूट जॅम
सकाळी ब्रेडवर जॅम लावून खाणे ही अनेकांची सवय असते. पण फ्रूट जॅममध्ये अनेकदा जिलेटिन हे घटक वापरले जाते, जे प्राण्यांच्या हाडांपासून तयार होते.
खाद्यतेल
काही आरोग्यदायी तेलांमध्ये ओमेगा 3 असल्याचा उल्लेख असतो, पण ते ओमेगा 3 माशांपासून मिळवलेले असते. त्यामुळे पूर्ण शाकाहारी असणाऱ्यांनी हे नेहमी तपासावे.
डोनट्स
स्वादिष्ट आणि मऊ डोनट्सही सुरक्षित नाहीत. काही डोनट्समध्ये एल-सिस्टीन हे प्रथिन असते, जे बदकाच्या पिसांपासून मिळवले जाते.
साखर
पांढरी साखर तयार करताना ती स्वच्छ करण्यासाठी नैसर्गिक कार्बनचा वापर केला जातो, जो प्राण्यांच्या हाडांपासून बनवला जातो. त्यामुळे तीही शुद्ध शाकाहारी राहात नाही.
दही
बाजारातून आणलेले दही अनेकदा जिलेटिनसह बनवले जाते. त्यामुळे त्यात मांसाहारी घटक असण्याची शक्यता असते. नेहमी पॅकवरील घटक नीट वाचावेत.
वाईन आणि बिअर
काही प्रकारच्या वाईन आणि बिअरमध्ये मासळीच्या मूत्राशयातून मिळणारा ‘इन्सिगालिया’ नावाचा घटक वापरला जातो, जो त्याला पारदर्शक बनवण्यासाठी वापरला जातो.