मैत्री हे नातं जन्माचं नसतानाही इतकं खास का असतं, याचं उत्तर अनेकांना देता येत नाही. कारण मैत्रीत जो आपुलकीचा ओलावा असतो, ती समजूतदार साथ, तो निरागस विश्वास हे सगळं कुठल्याही इतर नात्यात क्वचितच अनुभवायला मिळतं. आणि म्हणूनच प्रत्येक वर्षी एक दिवस केवळ या अनोख्या नात्यासाठी राखून ठेवला जातो, मैत्री दिन. यंदा हा खास दिवस रविवार, 3 ऑगस्ट 2025 रोजी साजरा होणार आहे.
मैत्री दिन म्हणजे केवळ गिफ्ट देण्याचा एक प्रसंग नाही, तर एक संधी असते, आपल्या मित्रांना ‘तू माझ्यासाठी खूप खास आहेस’ हे सांगण्याची. आणि जर तुम्हाला तुमच्या मित्रासाठी खास काही करायचं असेल, तर त्यांच्या राशीनुसार भेटवस्तू देण्याचा विचार जरूर करा. कारण राशीनुसार निवडलेली भेट ही केवळ एखादी वस्तू नसते, ती त्यांच्या स्वभावाशी, आवडीनिवडीशी आणि तुमच्याशी नातं सांगणारी आठवण ठरते.

मेष राशी
मेष राशीचा मित्र तंत्रज्ञानप्रेमी असतो. त्याला एखादं नवं गॅझेट, गेमिंग किट किंवा एखादा स्मार्ट डिव्हाइस दिलं, तर त्याचं समाधान तुम्हाला चेहऱ्यावर स्पष्ट दिसेल.
वृषभ राशी
दुसरीकडे, वृषभ राशीचे लोक सौंदर्य आणि संगीत याच्या प्रेमात असतात. त्यांच्यासाठी एखादं संगीत वाद्य किंवा एखाद्या शांत ट्रिपचं नियोजन ही एक उत्तम भेटवस्तू ठरेल.
मिथुन राशी
मिथुन राशीचे लोक नेहमी काहीतरी नवीन आणि क्रिएटिव्ह शोधत असतात. त्यांना कलात्मक, विचारप्रवृत्त भेटवस्तू दिली, तर त्यांना ती तुमच्या सगळ्या भेटींमधून उठून दिसेल.
कर्क राशी
कर्क राशीचे मित्र हे भावनिक आणि आठवणी जपणारे असतात. त्यांच्यासाठी एखादा फोटो फ्रेम, जुन्या आठवणींनी भरलेला अल्बम किंवा एक साधा हस्तलेख कार्डही त्यांचं मन जिंकू शकतो.
सिंह राशी
सिंह राशीच्या मित्रांमध्ये राजसपणा असतो. त्यांना काहीतरी उठावदार हवं असतं. स्टायलिश कपडे, चमकदार घड्याळं, महागडं गॅझेट… अशा भेटवस्तूंमधून त्यांना एक स्पेशल ट्रीट मिळते.
कन्या राशी
दुसरीकडे, कन्या राशीचे मित्र हे बारकावे जपणारे आणि मनापासून गोष्टी जपणारे असतात. त्यांच्या मनात घर करायचं असेल, तर एखादी प्रेमाने बनवलेली डायरी, हस्तलेखनातलं पत्र किंवा त्यांच्यासाठी खास बनवलेलं गिफ्ट त्यांना भावेल.
तूळ राशी
तूळ राशीचे लोक सौंदर्य आणि सौम्यता यांचं मिश्रण असतात. त्यांच्यासाठी एखादी गोड गाणी ऐकायची व्यवस्था किंवा त्यांच्यासोबत एकत्र केलेलं खास जेवण हेही खास भेट ठरू शकतं.
वृश्चिक राशी
वृश्चिक राशीचे मित्र थोडेसे अंतर्मुख असतात, त्यांना त्यांच्या स्पेसमध्ये काहीतरी खास हवं असतं. त्यांच्यासाठी एखादं प्रीमियम परफ्यूम, सुगंधी मेणबत्त्या किंवा रिलॅक्सेशनसाठी काही दिलं, तर ते खूप खुश होतात.
धनु राशी
धनु राशीचे मित्र म्हणजे उत्साही, धावते मन. त्यांचं मन नेहमी ज्ञानात रमलेलं असतं. त्यांना एखादं पुस्तक, आर्ट-संबंधित काही, किंवा नवीन शिकण्यासाठी काही भेट देणं ही त्यांच्या स्वभावाशी पूर्णपणे सुसंगत भेट ठरते.
मकर राशी
मकर राशीचे मित्र हे थोडेसे अंतर्मुख पण प्रेमळ असतात. त्यांना सॉफ्ट टॉय, आरामदायक ब्लँकेट किंवा उबदार भेटवस्तू आवडते.
कुंभ राशी
कुंभ राशीचे मित्र हे थोडे हटके, अनोख्या पसंतीचे असतात. त्यांना दुर्मिळ वस्तू, एखादं अँटीक शोपीस किंवा हँडमेड आर्टिकल्स देणं हे त्यांच्या हृदयाला भिडणारं ठरू शकतं.
मीन राशी
शेवटी मीन राशी ही खूप भावनिक आणि अध्यात्मिकदृष्ट्या संवेदनशील असते. देवतांच्या छोट्या मूर्ती, वास्तुशी संबंधित काही गोष्टी किंवा शांततेचा अनुभव देणारी भेट त्यांच्यासाठी योग्य ठरेल.