शेती ते वीज निर्मिती…’ही’ आहेत देशातील 5 सर्वात मोठी धरणं, यातील एकाचं नाव जागतिक टॉप 10 मध्ये!

Published on -

भारताच्या शेतीप्रधान संस्कृतीमध्ये धरणांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. मुसळधार पावसामुळे सध्या अनेक नद्या आणि धरणं दुथडी भरून वाहत आहेत. पाण्याचा हा साठा देशातील शेती, वीजनिर्मिती आणि पिण्याच्या पाण्यासाठी उपयोगी पडतो. अशा पार्श्वभूमीवर आज आपण भारतातील 5 सर्वात मोठ्या आणि ऐतिहासिक धरणांची माहिती घेणार आहोत, ज्यातील एक धरण जगातील सर्वात उंच 10 धरणांमध्ये गणलं जातं.

टिहरी धरण (उत्तराखंड)

भारताचे हे सर्वात उंच धरण असून, जगातील 8 व्या क्रमांकावर येतं. याची उंची तब्बल 260 मीटर आहे. हे धरण 52 चौरस किलोमीटरच्या पृष्ठभागावर पसरलेलं आहे. त्याची लांबी 575 मीटर, शिखराची रुंदी 20 मीटर आणि पायाची रुंदी 1,128 मीटर आहे. हे धरण भागीरथी नदीवर बांधलेलं असून, उत्तर भारतातील लाखो लोकांचा पाण्याचा मुख्य स्रोत आहे.

भाक्रा नांगल धरण (पंजाब-हिमाचल सीमा)

सतलज नदीवर वसलेलं हे धरण उंचीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या धरणाच्या पाण्याने ‘गोविंद सागर’ नावाचं मोठं जलाशय तयार झालं आहे. हे भारतातील तिसरं सर्वात मोठं जलाशय मानलं जातं. शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाणी आणि वीज या धरणातून पुरवलं जातं.

सरदार सरोवर धरण (गुजरात)

नर्मदा नदीवर वसलेलं हे धरण 138 मीटर उंच आहे आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं धरण मानलं जातं. याची वीज निर्मिती क्षमता तब्बल 1,450 मेगावॅट इतकी आहे. या प्रकल्पातून गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांना पाणी आणि वीज पुरवली जाते.

हिराकुंड धरण (ओडिशा)

जगातील सर्वात लांब धरणांपैकी एक असलेलं हे धरण माती, काँक्रीट आणि दगडापासून बनवलेलं आहे. याची लांबी 26 किलोमीटर आणि उंची 200 फूट आहे. हे धरण ओडिशामधील महानदीवर आहे. वीज निर्मितीची क्षमता 347.5 मेगावॅट आहे. पुर नियंत्रण आणि सिंचन यासाठी याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो.

नागार्जुन सागर धरण (तेलंगणा-आंध्र प्रदेश सीमा)

कृष्णा नदीवर वसलेलं हे जगातील सर्वात मोठ्या दगडी धरणांपैकी एक आहे. याची उंची 490 फूट आणि लांबी 1.6 किलोमीटर आहे. यामध्ये 11,472 दशलक्ष घनमीटर पाण्याची साठवण क्षमता आहे. हे धरण 815.6 मेगावॅट वीज निर्माण करू शकतं आणि आंध्र-तेलंगणातील लाखो लोकांना त्याचा फायदा होतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!