भारताच्या रेल्वे इतिहासात अनेक रोचक गोष्टी आहेत, पण काही गोष्टींचा विचार करताच अंगावर काटा येतो. होय, आपण ज्या ट्रेनमध्ये रोज प्रवास करतो, त्याच भारतात काही रेल्वे स्थानके अशीही आहेत जी झपाटलेली मानली जातात. ही ठिकाणं रात्रीच्या वेळी इतकी भयावह होतात की स्थानिक लोक सुद्धा तिथं जायला घाबरतात. काही स्टेशनांवर प्रवाशांनी पांढऱ्या साडीतील बाईला पाहिल्याचं सांगितलंय, तर काही ठिकाणी अचानक ब्रेक लागणाऱ्या ट्रेनचा अनुभव अनेकांनी घेतलाय. चला, जाणून घेऊया भारतातील 6 अशी रेल्वे स्थानकं जिथं प्रत्येक क्षण थरारक अनुभव वाटतो.
बरोग रेल्वे स्थानक

हिमाचल प्रदेशातील उंच डोंगरात वसलेलं हे स्टेशन कर्नल बरोग यांच्या आत्महत्येमुळे झपाटलेलं मानलं जातं. कर्नल बरोग हे ब्रिटिश अभियंता होते. ते एक बोगदा बांधत होते, पण तो पूर्ण होण्याआधी त्यांनी आत्महत्या केली. स्थानिक लोकांच्या मते, आजही त्यांच्या आत्म्याचा वावर स्टेशनजवळ जाणवतो.
बेगुनाकोडोर रेल्वे स्थानक
हे स्टेशन घनदाट जंगलांमध्ये वसलेलं आहे. इथं एका पांढऱ्या साडीतील महिलेचं भूत दिसल्याचं लोक म्हणतात. कथेप्रमाणे, ती महिला आत्महत्या केलेली होती आणि तिचा आत्मा अजूनही इथे फिरत असतो.
चित्तूर रेल्वे स्थानक
चित्तूर स्टेशनवर एक महिला ट्रेनखाली चिरडली गेली होती. तेव्हापासून इथं तिची रडण्याची सावली अनेक प्रवाशांनी पाहिली आहे. काही कर्मचाऱ्यांनी रात्री तिचे आक्रोशही ऐकले आहेत.
धनबाद रेल्वे स्थानक
इथंही रात्री विचित्र सावल्या आणि आवाज अनुभवले गेले आहेत. काही प्रवाशांनी प्लॅटफॉर्मवर एक महिला भटकताना पाहिल्याचं सांगितलंय. आवाज इतके भीतीदायक असतात की अनेकजण स्टेशनवर थांबण्याचं टाळतात.
डोंबिवली रेल्वे स्थानक
मुंबईच्या या उपनगरातील हे स्थानक अनेक अपघातांसाठी कुप्रसिद्ध आहे. प्रवाशांच्या मते, इथे कोणत्याही कारणाशिवाय ट्रेन थांबते किंवा अचानक ब्रेक लावले जातात. काहींना विचित्र ओरडाही ऐकू आला आहे.
लुधियाना रेल्वे स्थानक
लुधियाना स्थानकाच्या आरक्षण कार्यालयात एका रेल्वे कर्मचाऱ्याचा आत्मा अजूनही असल्याचं मानलं जातं. त्याचा मृत्यू ड्युटीवर झाला होता. तेव्हापासून लोक सांगतात की त्या कार्यालयात विचित्र गोष्टी घडतात.