Honor, Lenovo ते Redmi! ₹15,000 पेक्षा कमी किमतीत मिळतायत ‘हे’ जबरदस्त टॅबलेट्स, जाणून घ्या बेस्ट डील्स

Published on -

जर तुम्ही अशा टॅबलेटच्या शोधात असाल ज्यात मोठा स्क्रीन, चांगली परफॉर्मन्स आणि बजेटच्या मर्यादेत भरपूर फिचर्स मिळावेत, तर सध्या बाजारात 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत काही बेस्ट पर्याय उपलब्ध आहेत. विशेषतः विद्यार्थ्यांपासून ते कामाच्या ठिकाणी किंवा घरात वापरणाऱ्या प्रत्येकासाठी हे टॅबलेट्स उपयुक्त ठरू शकतात. ऑनलाइन अभ्यास, ई-बुक्स वाचन, व्हिडिओ कॉल्स, OTT कंटेंट बघणे किंवा हलका गेमिंग अनुभव अशा विविध गरजांसाठी हे टॅबलेट्स योग्य आहेत.

Honor Pad X9

या श्रेणीत ‘Honor Pad X9’ हा सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला पर्याय आहे. जवळपास 12.1 इंचाचा 2K डिस्प्ले, 6GB RAM आणि स्नॅपड्रॅगन 685 सारखा प्रोसेसर असल्याने, हा टॅबलेट केवळ बघायला स्टायलिश नाही, तर वापरण्यासही वेगवान आणि सुरळीत आहे. यात दिलेली 7250mAh बॅटरी दीर्घकाळ चालते आणि Android 13 वर आधारित इंटरफेसमुळे अनुभव अधिक सहज वाटतो. याची किंमत Amazon वर 13,999 रुपये आहे, जी या फीचर्सच्या तुलनेत नक्कीच वाजवी वाटते.

Lenovo Tab M11

याचप्रमाणे, Lenovo Tab M11 हा 11 इंचाच्या FHD डिस्प्लेसह येणारा पर्याय आहे. त्याचा 90Hz रिफ्रेश रेट आणि Helio G88 प्रोसेसर यामुळे त्याचा अनुभव खूपच स्मूद वाटतो. 13MP चा रिअर कॅमेरा आणि 7040mAh बॅटरी यामुळे तो केवळ कामासाठीच नव्हे, तर मिडियासाठीही योग्य आहे. त्याची किंमत सध्या 11,799 रुपये आहे.

Realme Pad 2 Lite

Realme Pad 2 Lite देखील त्याच्या भक्कम 8300mAh बॅटरीमुळे आणि आकर्षक डिस्प्लेमुळे अनेकांची पसंती ठरत आहे. Android 14 वर चालणाऱ्या या टॅबमध्ये MediaTek Helio G99 प्रोसेसर देण्यात आला आहे. जरी याची किंमत 14,699 रुपये आहे, तरीही हे टॅबलेट दीर्घकालीन वापरासाठी जबरदस्त आहे.

Redmi Pad SE

Redmi चा Pad SE हा 11 इंचाचा FHD+ डिस्प्लेसह येतो आणि Snapdragon 680 प्रोसेसरसह यामध्ये 8000mAh ची दमदार बॅटरी आहे. यामुळे तो वर्क आणि प्ले दोन्ही गोष्टींसाठी उपयुक्त ठरतो. याची किंमत केवळ 10,900 रुपये असून, ही एक बेस्ट ठरू शकते.

Nokia T10

यानंतर Nokia T10 हा आठ इंचाच्या स्क्रीनसह येणारा एक हलका आणि पोर्टेबल पर्याय आहे. Android 12 वर आधारित असूनही यामध्ये आवश्यक ते सर्व बेसिक फीचर्स दिले आहेत. Unisoc T606 प्रोसेसर आणि 5000mAh बॅटरी असलेला हा टॅबलेट केवळ 8,455 रुपयांना मिळतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!