क्रिकेटच्या दुनियेत खेळगुणांसोबतच कमाईच्या बाबतीतही काही नावे सर्वोच्च स्थानावर आहेत. विराट कोहली, सचिन तेंडुलकर आणि एमएस धोनी हे तिघे केवळ मैदानात नव्हे तर त्याच्या बाहेरही करोडोंच्या कमाईमुळेही चर्चेत असतात. त्यांच्या संपत्तीचा आणि वार्षिक कमाईचा आकडा इतका मोठा आहे की, तो ऐकून सामान्य माणसाला चक्कर यावी.

भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या क्रिकेट दिग्गजांच्या कमाईविषयी धक्कादायक माहिती उघड केली. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनच्या “Stick to Cricket” पॉडकास्टवर त्यांनी या दिग्गजांच्या ब्रँड डिल्स आणि जाहिरातींद्वारे होणाऱ्या उत्पन्नावर भाष्य केलं.
रवी शास्त्री यांचा खुलासा
रवी शास्त्री म्हणाले की, “हे खेळाडू वर्षभरात ब्रँड्ससोबतच्या करारांद्वारे 100 कोटींपेक्षा जास्त कमावतात.” त्यांनी स्पष्ट केलं की ही रक्कम 10 million pounds (सुमारे 106 कोटी रुपये) पेक्षा जास्त असू शकते. हे ऐकताच पॅनलमधील एकाने “Wow!” अशी प्रतिक्रिया दिली. यावरूनच समजते की या तिघांची ब्रँड व्हॅल्यू किती मोठी आहे.
इतकेच नव्हे, तर धोनी, कोहली आणि सचिन हे दररोज 15 ते 20 जाहिराती करतात, असं शास्त्री म्हणाले. भारतात क्रिकेटच्या लोकप्रियतेमुळे या जाहिरातींचा वेग आणि प्रमाण खूपच जास्त आहे. एका दिवसात एवढ्या जाहिराती म्हणजे यांचं उत्पन्न किती प्रचंड असेल याचा अंदाज आपण लावू शकतो.
तिघांची एकूण संपत्ती
तिघांची एकूण संपत्ती ही 1,000 कोटींपेक्षा जास्त असल्याचा अंदाज अनेक अहवालांमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. यात त्यांची जाहिरात रक्कम, IPL किंवा इतर लीग्समधील कमाई, गुंतवणूक करार, ब्रँड एंडोर्समेंट्स, आणि स्वतःचे व्यवसाय हे सर्व घटक आहेत.
सचिन तेंडुलकर हे निवृत्तीनंतरही जाहिराती आणि सामाजिक उपक्रमांमधून मोठ्या प्रमाणावर पैसे कमावत आहेत. विराट कोहली हा आजच्या घडीचा सर्वाधिक कमावणारा भारतीय खेळाडू मानला जातो, तर एमएस धोनीचे ब्रँड आणि बिझनेस नेटवर्कसुद्धा विस्तारले आहे.