दररोज 2.5GB डेटा, OTT अ‍ॅक्सेस आणि मोफत कॉलिंग मिळवा, ‘ही’ कंपनी देतेय जबरदस्त रीचार्ज ऑफर!

Published on -

जर तुम्ही मोबाईलसाठी असा प्लॅन शोधत असाल ज्यामध्ये भरपूर डेटा, ओटीटी अ‍ॅक्सेस, मोफत कॉलिंग आणि एसएमएससह 5G सुविधाही मिळावी, तर जिओचे 2.5GB डेटा दररोज देणारे प्लॅन तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात. जिओने अशा अनेक प्रीपेड प्लॅनची रचना केली आहे, जे कमी कालावधीपासून ते वर्षभराच्या वैधतेसह येतात.

₹399 चा प्लॅन

हा प्लॅन थोड्या कालावधीसाठी असूनही, त्याचे फायदे अनेक आहेत. यामध्ये दररोज 2.5GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएस मिळतात. तसेच, वापरकर्त्यांना JioTV आणि JioCinema चा मोफत अ‍ॅक्सेस दिला जातो. पात्र ग्राहकांसाठी अमर्यादित 5G डेटाही यामध्ये समाविष्ट आहे.

 

₹2025 चा प्लॅन

 

अधिक वैधतेसह येणाऱ्या या प्लॅनमध्येही दररोज 2.5GB डेटा दिला जातो. यामध्ये अमर्यादित कॉलिंग, 100 मोफत एसएमएस, JioTV आणि JioCinema चा अ‍ॅक्सेस मिळतो. 5G नेटवर्कसाठी पात्र वापरकर्त्यांना अनलिमिटेड डेटा मिळतो, जो कोणत्याही अडथळ्याशिवाय वापरता येतो.

₹3599 चा प्लॅन

 

हा प्लॅन एक वर्षासाठी असून, त्यातही दररोज 2.5GB डेटा दिला जातो. म्हणजेच संपूर्ण वर्षात 900GB हून अधिक डेटा उपलब्ध होतो. यामध्ये OTT फायदे जसे की JioTV आणि JioCinema चा मोफत अ‍ॅक्सेस मिळतो. यात अमर्यादित 5G डेटा आणि सर्व नेटवर्कसाठी फ्री कॉलिंगही आहे.

₹3999 चा प्लॅन

सर्वात प्रीमियम प्लॅनपैकी एक असलेल्या या प्लॅनमध्येही 365 दिवसांची वैधता आणि दररोज 2.5GB डेटा मिळतो. पण यामध्ये अतिरिक्त लाभ म्हणून FanCode चाही मोफत अ‍ॅक्सेस मिळतो. खेळांचे शौकीन ग्राहक याचा उपयोग IPL, फुटबॉल, क्रिकेट अशा विविध स्पर्धांचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी करू शकतात.

या सर्व प्लॅन्समध्ये मिळणाऱ्या कॉमन सुविधा पाहिल्या तर, त्यात दररोज 2.5GB डेटा (5G पात्रतेनुसार अनलिमिटेड), देशभरात अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 मोफत एसएमएस आणि JioTV, JioCinema आणि निवडक प्लॅन्समध्ये FanCode अ‍ॅक्सेस मिळतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!