फक्त 2 रुपये दररोज देऊन मिळवा 10 लाखांचा अपघात विमा, जाणून घ्या पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना!

Published on -

दैनंदिन आयुष्यातल्या अनिश्चिततेला तोंड देताना, गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना अनेकवेळा मोठ्या संकटांचा सामना करावा लागतो. अपघात किंवा गंभीर दुखापतीसारखी स्थिती येते तेव्हा आर्थिक आधार नसेल, तर परिस्थिती अधिक कठीण बनते. अशा वेळी जर केवळ 2 रुपयांच्या दररोजच्या हप्त्यातून तुमच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांपर्यंतचं विमा संरक्षण मिळत असेल, तर ती गोष्ट किती महत्त्वाची आणि दिलासादायक ठरू शकते, याची कल्पनाही अनेकांना धक्का देईल.

टाटा एआयजी ग्रुप अ‍ॅक्सिडेंट इन्शुरन्स पॉलिसी

भारतीय पोस्ट ऑफिसचा भाग असलेल्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने (IPPB) टाटा एआयजीसोबत हातमिळवणी करत एक परवडणारी, पण प्रभावी अशी अपघात विमा योजना सुरू केली आहे. टाटा एआयजी ग्रुप अ‍ॅक्सिडेंट इन्शुरन्स पॉलिसी असं या योजनेचं नाव असून, तिचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. अशा नागरिकांपर्यंत विम्याचं कवच पोहोचवणं, जे महागड्या प्रीमियममुळे नेहमी विम्यापासून दूर राहतात.

ही योजना खास करून अशा मेहनती लोकांसाठी उपयुक्त आहे जे रोजच्या रोज उत्पन्नासाठी इतर शहरांत, गावांमध्ये जाऊन काम करतात. जसं की मजूर, ड्रायव्हर, डिलिव्हरी बॉय किंवा इतर कामगार. हे सगळेच अपघाताच्या अधिक धोकादायक झोनमध्ये वावरतात. अशा लोकांसाठी ही योजना केवळ संरक्षण नाही, तर धीर देणारी एक विश्वासाची सोबत आहे.

योजनेचे प्रीमियम

या विमा योजनेमध्ये दोन प्रीमियम प्रकार आहेत. वार्षिक ₹339 आणि ₹699. दररोज हिशेब केला, तर हा खर्च फक्त 2 रुपये इतकाच येतो. एवढ्याशा रकमेच्या बदल्यात तुम्हाला 5 लाखांपासून 10 लाख रुपयांपर्यंतचं विमा कव्हर मिळू शकतं. यामध्ये अपघाती मृत्यू, कायमस्वरूपी अपंगत्व, गंभीर हाडमोड किंवा भाजल्यास मदतीची रक्कम, रुग्णालयात लागणाऱ्या खर्चासाठी रोख मदत यासारख्या सुविधांचा समावेश आहे.

अर्थात, काही गोष्टी या विमा योजनेच्या कक्षेबाहेर आहेत. उदा. आधीपासून असलेले आजार, आत्महत्या, मद्य किंवा अंमली पदार्थांच्या नशेत झालेला अपघात, साहसी खेळांमधून झालेला मृत्यू, युद्ध किंवा बेकायदेशीर कृतींमधून झालेली हानी यांना या योजनेत समाविष्ट केलेले नाही.

योजनेच्या अटी

या विम्याचा लाभ घेण्यासाठी तुमचं वय 18 ते 65 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे आणि IPPB बँकेत तुमचं खातं असणंही गरजेचं आहे. विशेष म्हणजे हे खाते केवळ ₹100 मध्ये उघडता येतं. विमा खरेदीसाठी तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट देऊ शकता किंवा IPPB च्या मोबाईल अ‍ॅपद्वारे देखील हे सहज करता येतं.

कधी दुर्भाग्यवश एखादा अपघात घडला आणि तुम्हाला दाव्याची गरज भासली, तर त्या प्रक्रियाही सोप्या ठेवण्यात आल्या आहेत. तुम्ही तुमच्या नोंदणीकृत नंबरवरून ‘CLAIM’ असा एसएमएस 5616181 या क्रमांकावर पाठवू शकता. अधिक माहिती हवी असल्यास, टोल-फ्री क्रमांकांवर कॉल करता येतो. आवश्यक कागदपत्रं ईमेलद्वारेही पाठवता येतात. सर्व तपासणी पूर्ण झाल्यानंतर, 15 ते 20 दिवसांत विमा रक्कम थेट तुमच्या IPPB खात्यात जमा होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!