जगातल्या प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो, आणि हे वेगळेपण केवळ त्यांच्या वागणुकीत नाही, तर त्यांच्या निर्णय घेण्याच्या पद्धतीतही दिसून येतं. विशेषत: मुलींबाबत अनेकदा असं म्हटलं जातं की त्या हृदयाने विचार करणाऱ्या असतात, भावनांवर चालणाऱ्या असतात. पण अंकशास्त्र काहीसा वेगळाच दृष्टिकोन समोर आणतो. काही विशिष्ट अंकांच्या प्रभावाखाली जन्मलेल्या मुली या नेहमीच भावनांनी नाही, तर डोक्याने विचार करून निर्णय घेतात. त्यांची वृत्ती वास्तववादी असते आणि परिस्थितीचं तारतम्य ठेऊन त्या योग्य निर्णयाकडे वळतात.

अंकशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीचा मूळ अंक त्याच्या जन्मतारखेवर आधारित असतो. 1 ते 30 यामधील कोणतीही तारीख असली, तरी त्या तारखेतील सर्व अंकांची बेरीज करून एक एकेरी अंक मिळवला जातो, जो त्या व्यक्तीचा मूलांक ठरतो. हा अंक त्यांच्या स्वभाव, विचारसरणी आणि आयुष्यातील निर्णय घेण्याच्या क्षमतेवर प्रभाव टाकतो.
मूलांक 2
मूलांक 2 असलेल्या मुली, म्हणजे ज्या मुलींचा जन्म 2, 11, 20 किंवा 29 तारखेला झाला आहे, त्या विशेषतः शांत आणि समजूतदार असतात. त्यांच्या स्वभावात एक प्रकारची सोज्वळ भावना असते, पण त्याचबरोबर विचारपूर्वक निर्णय घेण्याची जबरदस्त क्षमता देखील असते. चंद्र हा या अंकाचा स्वामी ग्रह असल्यामुळे या मुली संवेदनशील असल्या तरी भावनांमध्ये वाहून जात नाहीत. त्या परिस्थितीचा नेमका अंदाज घेतात, समोरच्याच्या भावनांचा विचार करत निर्णय घेतात, पण स्वतःची जागा ठामपणे सांभाळतात. भांडणं, वाद, किंवा गैरसमज टाळून त्या नेहमीच संयमित वागण्यावर भर देतात.
मूलांक 5
अशाचप्रकारे, मूलांक 5 असलेल्या मुली, म्हणजे ज्या मुली 5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेल्या आहेत, त्या बुध ग्रहाच्या प्रभावाखाली असतात. बुध म्हटलं की बुद्धी, तर्क आणि संवाद यांचं प्रतीक. या मुली प्रचंड व्यावहारिक असतात. त्यांच्या बोलण्यात स्पष्टपणा असतो आणि त्या कोणतीही गोष्ट नुसत्या मनाच्या भरात किंवा घाईगडबडीत ठरवत नाहीत. त्या प्रत्येक गोष्टीकडे सजगतेने पाहतात, विचार करतात आणि मग निर्णय घेतात. त्यामुळे त्या जिथे असतात, तिथे एक प्रकारचं स्थैर्य जाणवतं.
या दोन मूळ अंकांच्या मुलींच्या निर्णय क्षमतेकडे पाहिलं तर लक्षात येतं की त्या केवळ संवेदनशील नाहीत, तर अत्यंत परिपक्व आणि स्थिरवृत्तीच्या आहेत. त्यांच्या प्रत्येक कृतीमागे एक भक्कम विचार असतो. कधी कधी जीवनात भावनांवर आधारित निर्णय घ्यावे लागतात, पण या मुली त्या भावनांना बाजूला ठेवून मनाच्या ताकदीने योग्य निर्णय घेऊ शकतात, आणि हेच त्यांचं खास वैशिष्ट्य ठरतं.