कधी कधी एक विशिष्ट जन्मतारीखही आयुष्याच्या प्रत्येक वळणावर भाग्याची साथ देणारी ठरते. अशीच गोष्ट आहे त्या मुलींची, ज्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्म घेतात. अंकशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर, या तारखा केवळ आकडे नसून, त्या मुलींचं नशिब ठरवणाऱ्या ठरतात. त्यांच्या स्वभावात, रूपात, नातेसंबंधांत आणि आर्थिक घडामोडीत एक वेगळीच चमक असते, जी कुठल्याही घराला समृद्ध बनवते.

मूलांक 6
या मुलींचा मूलांक 6 मानला जातो, आणि या संख्येचा कारक ग्रह म्हणजे शुक्र. शुक्र म्हणजे सौंदर्य, ऐश्वर्य, कला, प्रेम आणि समृद्धीचा अधिपती. म्हणूनच या तारखेला जन्मलेल्या मुलींमध्ये देखणं रूप, सहज संवाद कौशल्य, गोडवा आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व असतं. त्यांच्या वावरण्यात इतकी मोहकता असते की त्या ज्या घरात वावरतात, तिथे आनंद, पैसा आणि समाधान आपोआप खेचले जातात.
मूलांक 6 असलेल्या या मुली आयुष्यात कधीच पैशाच्या अडचणींनी घेरल्या जात नाहीत. त्यांच्या मार्गावर आर्थिक संधी आपोआप चालत येतात. अशा मुलींचं नशीब इतकं बळकट असतं की त्या केवळ स्वतःलाच नव्हे, तर त्यांच्या जोडीदारालाही आर्थिक समृद्धीच्या मार्गावर घेऊन जातात. म्हणूनच अनेकदा सांगितलं जातं की, या तारखेला जन्म झालेल्या मुलींशी लग्न लगेच करा. कारण त्या ज्या घरात जातात, तिथे लक्ष्मीचा वास होतो.
स्वभाव आणि गुण
या मुली केवळ नशिबाने नव्हे, तर स्वभावानेही खूप खास असतात. त्या शांत स्वभावाच्या, समजूतदार आणि जबाबदार असतात. त्यांच्यावर विश्वास ठेवणं सहज शक्य असतं कारण त्या एकदा दिलेला शब्द कधीही मोडत नाहीत. त्या आपुलकीने बोलतात, समोरच्याची काळजी घेतात आणि मन जिंकण्याचं कसब जन्मजात असतं.
त्यांच्या सौंदर्याचीही एक वेगळीच कथा असते. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर त्या अधिकच खुलतात. त्यांच्या सौंदर्यात एक तेज असतं, जे फक्त बाहेरून दिसत नाही, तर त्यांच्या आत्मविश्वासातून झळकतं. त्या स्वतःच्या आवडीनिवडींबाबत खूप स्पष्ट असतात. विशेषतः कला, संगीत, नृत्य यासारख्या क्षेत्रांमध्ये त्यांचा खास ओढा असतो. त्यांचं सर्जनशील मन त्यांना आयुष्यात वेगळं स्थान मिळवून देतं.
या साऱ्या गुणांमुळे मूलांक 6 असलेल्या मुली समाजात नाव कमावतात. त्यांचं नशीब त्यांना सतत पुढे घेऊन जातं आणि ज्या गोष्टींसाठी इतरांना खूप प्रयत्न करावे लागतात, त्या यांच्यासाठी सहज मिळतात. त्या ज्या घरात जातात, तिथलं वातावरण प्रेमळ, शांत आणि समृद्ध होतं.