GK 2025 : एक-दोन नव्हे तब्बल 17 नद्या वाहतात ‘या’ जिल्ह्यात, तुम्हाला माहितेय का या जिल्हयाचं नाव?

Published on -

उत्तर प्रदेश म्हटलं की अनेकांच्या डोळ्यांसमोर गंगेचा किनारा, वाराणसीचा घाट आणि अयोध्येचा धार्मिक गंध उभा राहतो. पण या राज्यात असंही एक ठिकाण आहे जे केवळ धार्मिकतेसाठी नाही तर निसर्गाच्या विलक्षण देणगीसाठीही प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यात एक-दोन नाही तर तब्बल 17 नद्या वाहतात. होय, ऐकायला थोडं अविश्वसनीय वाटतं, पण नकाशावर पाहिलं तर हे दृश्य खरंच थक्क करणारे आहे.

आजमगड जिल्हा

ही कथा आहे आजमगड जिल्ह्याची. पूर्व उत्तर प्रदेशातील या जिल्ह्याला धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असतानाच, नद्यांच्या अपार संख्येमुळे भौगोलिक दृष्टिकोनातूनही अनोखे स्थान मिळाले आहे. येथून 17 नद्या वेगवेगळ्या दिशेने वाहत असून, त्यामध्ये काही मोठ्या, काही लहान आणि काही उपनद्या आहेत. प्रमुख नद्यांमध्ये घाघरा, तामसा आणि छोटी शरयू यांचा समावेश होतो. या नद्यांचा प्रवाह या जिल्ह्याच्या कृषिसंस्कृतीला आणि जीवनशैलीला आकार देतो.

महत्वाच्या नद्या

घाघरा नदी ही जिल्ह्याच्या उत्तर भागातून पश्चिमेकडून पूर्वेकडे सुमारे 45 किलोमीटरपर्यंत प्रवास करते. तिला उत्तर भारतातील गंगेची उपनदी मानले जाते. तिच्या प्रवाहामुळे परिसरातील मातीला गाळयुक्त समृद्धी लाभते. दुसरी महत्त्वाची नदी म्हणजे तामसा, जिला रामायणातही उल्लेख मिळतो. ही नदी आंबेडकरनगर जिल्ह्यातून आजमगडमध्ये प्रवेश करते आणि संपूर्ण जिल्ह्यातून मध्यभागाने वाहते. ती शेवटी घाघरा नदीला जाऊन मिळते. लहान असली तरी श्रद्धेचा मोठा आधार असलेली छोटी शरयू नदी महाराजगंजमधून वाहत जिल्ह्याच्या जीवशैलीचा भाग बनली आहे.

इतर नद्या

पण या प्रमुख नद्यांव्यतिरिक्तही येथे बेसो, गंगी, मंजुई (मंजुषा), उदंती, कुंवर, सिलनी, मंगाई, भैंशी, ओरा, बगाडी, सुकसुई, लोणी, दोना आणि कायद अशा अनेक नद्यांचा समावेश आहे. काही नद्या तलावांतून उगम पावतात तर काही जिल्ह्यांच्या सीमेवरून या भागात प्रवेश करतात. गंगी नदी लालगंजमधील एका लहान तलावातून उगम पावते, तर मंजुषा ही नदी सुलतानपूर जिल्ह्यातून सुरू होऊन आजमगडमध्ये तामसाला मिळते. कुंवर, बगाडी आणि मंगाईसारख्या नद्या ही जिल्ह्याच्या विविध भागांतून वाहत तिथल्या शेतीसाठी पाण्याचा महत्त्वाचा स्रोत बनतात.

या सर्व नद्यांनी मिळून आजमगड जिल्ह्याला जणू काही पवित्रतेचं आणि नैसर्गिक वैभवाचं वरदान दिलं आहे. इथे नदी म्हणजे केवळ पाण्याचा प्रवाह नाही, तर ती लोकजीवनाचा भाग आहे. सण, पूजाअर्चा, शेती, प्रवास या प्रत्येक गोष्टीत तिचं स्थान आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!