OnePlus यूजर्ससाठी आनंदाची बातमी! तब्बल 13 जुन्या मॉडेल्सला मिळणार नवीन OxygenOS 16 अपडेट; UI, गेमिंग, बॅटरी सगळं बदलणार

Published on -

जर तुम्ही OnePlus चे यूजर्स असाल आणि तुमच्या हातातला फोन काहीसा जुना वाटू लागला असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी खरंच समाधानाची ठरणार आहे. OnePlus आपल्या अनेक जुन्या डिव्हाइससाठी Android 16 वर आधारित OxygenOS 16 अपडेट घेऊन येत आहे, आणि या नव्या अपडेटमुळे तुमच्या फोनचा लूक, कामगिरी, बॅटरी आणि सुरक्षा सर्वच बाबतीत मोठा बदल जाणवणार आहे. इतकंच नव्हे तर नवीन AI फीचर्ससह हा अपडेट तुमच्या फोनला नवसंजीवनी देईल.

OnePlus ने यंदाच्या अपडेटमध्ये खास लक्ष दिलं आहे की, प्रत्येक युजर मग तो फ्लॅगशिप फोन वापरत असेल, की Nord मालिका, की टॅबलेट प्रत्येकासाठी काही ना काही नवीन देणं आवश्यक आहे. Android 16 नंतर लगेच हा अपडेट देणं हे OnePlus च्या जलद आणि विश्वासार्ह सेवा धोरणाचं स्पष्ट उदाहरण आहे.

‘या’ फोनला मिळणार OxygenOS 16 अपडेट

या अपडेटची यादी पाहिली तर त्यात, OnePlus 13, 13s, 13R, 13T, OnePlus 12, 12R, 11 आणि 11R या फ्लॅगशिप फोनचा समावेश आहे. तसेच Nord मालिका देखील मागे नाही Nord 4, Nord 3, Nord CE 4, Nord CE 4 Lite यांना हे अपडेट दिलं जाणार आहे. याशिवाय OnePlus Open फोल्डेबल फोन आणि OnePlus Pad, OnePlus Pad 2 यांसारख्या टॅब्लेटसुद्धा यामध्ये समाविष्ट आहेत.

या अपडेटमुळे फक्त इंटरफेसच नव्हे, तर परफॉर्मन्समध्येही अमूलाग्र बदल होणार आहेत. फोन अधिक स्मूथ, वेगवान आणि स्मार्ट होईल. नव्या AI बूस्टिंग अल्गोरिदममुळे फोन तुमच्या वापराच्या सवयी समजून बॅकग्राउंड अ‍ॅप्सचं व्यवस्थापन करेल. परिणामी, बॅटरी लवकर संपणार नाही आणि अ‍ॅप्स अधिक जलद चालतील.

गेमिंग अपडेट

गेमिंगसाठी तर हे अपडेट एक वरदानच आहे. नवीन गेम डॅशबोर्डमुळे तुम्ही रिअल टाइममध्ये FPS, ब्राइटनेस, नेटवर्क स्थिरता आणि पॉवर सेव्हिंग यांचं व्यवस्थापन करू शकाल. एक खास फीचर म्हणजे बॅटरी चार्जिंग लिमिट, आता तुम्ही चार्जिंग 80%, 90% किंवा 100% पर्यंतच ठेवू शकता, जे दीर्घकाळ बॅटरी टिकवून ठेवेल.

नवीन अपडेट डाउनलोड कसं कराल?

हे अपडेट करताना, फोन 50% चार्ज ठेवणं आणि Wi-Fi कनेक्शन असणं आवश्यक आहे. यासोबत, अपडेट आधी सेटिंग्जमधून बॅकअप घेणं विसरू नका System > Backup वर जाऊन हे करता येईल. अपडेट उपलब्ध झाल्यावर, Software Update > Check for Updates वर क्लिक करा आणि ते डाउनलोड करा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!