केस गळती, त्वचेची ऍलर्जी, पचन बिघाड आणि…; शरीरासाठी अमृतसमान आहे मोरासारखी दिसणारी ‘ही’ वनस्पती!

Published on -

मोर म्हणजेच तांबूस-पानांची आकर्षक वनस्पती, जी आपल्याला घराच्या अंगणात किंवा कुंड्यांमध्ये सहज दिसते, ती केवळ सौंदर्यवर्धक नसून शरीरासाठीही अमूल्य औषध आहे. ही झाडं फक्त डोळ्यांना आनंद देत नाहीत, तर अनेक गंभीर आजारांपासून आपले संरक्षणही करतात. विशेषतः आयुर्वेदिक परंपरेत मोराचा उपयोग हजारो वर्षांपासून केला जात आहे.

त्वचेपासून ते पचन, दमा ते मधुमेह अशा अनेक समस्यांवर मोर प्रभावी उपाय ठरतो.मोर वनस्पतीला प्राचीन काळापासून औषधी उपयोगासाठी महत्त्व देण्यात आले आहे. तिच्या पानांचा रस, अर्क, पेस्ट यांचा उपयोग वेगवेगळ्या रोगांवर केला जातो.

‘ताम्रपर्णी’ किंवा ‘धर्तुनी’ म्हणूनही ही ओळखली जाते. त्वचाविकार, सर्दी-खोकला, अपचन यासारख्या रोजच्या त्रासांवर घरगुती उपाय म्हणून मोर खूप उपयुक्त ठरते. अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटीऑक्सिडंट घटकांमुळे ती शरीरातील सूज कमी करते आणि त्वचेचे जळजळीत विकारही बरे करते.

मोर वनस्पतीची फायदे

संधिवात आणि सांधेदुखी यावर मोराची पेस्ट लावल्यास आराम मिळतो. पचनाच्या तक्रारी असलेल्या लोकांनी मोराचा अर्क घेतल्यास जळजळ आणि अपचनासारख्या त्रासांपासून मुक्तता मिळते. केस गळती थांबवण्यासाठी आणि टक्कल पडणे रोखण्यासाठीही मोराचा रस प्रभावी मानला जातो.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी मोर अतिशय फायदेशीर आहे. याचे नियमित सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. श्वसनाच्या विकारांमध्ये, विशेषतः दमा, ब्राँकायटिस, आणि श्वास घेण्यास अडचण अशा लक्षणांमध्ये मोराचा हर्बल चहा खूप उपयोगी ठरतो. शिवाय, शरीरातील विषारी घटक बाहेर टाकून रोगप्रतिकारशक्ती वाढवणं हेही मोराच्या प्रमुख गुणांपैकी एक आहे.

मात्र, या वनस्पतीचा वापर करताना काही दक्षता घेणे अत्यावश्यक आहे. गर्भवती महिला, स्तनपान करणाऱ्या महिला आणि ज्यांना आधीच काही गंभीर आजार आहेत, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच याचा वापर करावा. अति सेवन केल्यास दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!