किडनी स्टोनवरील घरगुती रामबाण उपाय, ‘या’ हिरव्या पानांचा चहा करेल कमाल! पाहा कधी आणि कशाप्रकारे प्याल हा चहा

Updated on -

किडनी स्टोनसारख्या वेदनादायक त्रासाने ग्रस्त असाल तर तुमच्यासाठी एक दिलासादायक उपाय तुमच्या स्वयंपाकघरातच लपलेला आहे, तो म्हणजे तुळशीचा चहा. आधुनिक जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे किडनी स्टोनची समस्या आता फारच सामान्य झाली आहे.

मात्र ही समस्या सामान्य असली तरी यामधून निर्माण होणाऱ्या वेदना असह्य असतात. काही वेळा हे दगड इतके त्रासदायक ठरतात की औषधे, इंजेक्शन्स आणि ऑपरेशनपर्यंत जावे लागते. पण काही घरगुती उपाय हे नैसर्गिकरित्या आराम मिळवून देऊ शकतात आणि त्यात तुळशीचा चहा एक प्रभावी पर्याय मानला जातो.

तुळशीचा चहा

 

तुळशी ही भारतीय संस्कृतीत पूजनीय असली तरी तिचे औषधी गुणधर्मही कमालीचे आहेत. विशेषतः अ‍ॅसिटिक अ‍ॅसिड नावाचा एक घटक तुळशीच्या पानांमध्ये आढळतो, जो लघवीमार्गाने दगड बाहेर टाकण्याची प्रक्रिया सुलभ करतो. हा घटक किडनीतील दगड हळूहळू वितळवतो, त्यामुळे मोठ्या वेदनांशिवाय ते शरीराबाहेर टाकले जाऊ शकतात. त्यामुळे छोट्या स्टोन्ससाठी हा उपाय खूप उपयोगी ठरतो.

तसंच, तुळशीमध्ये ‘अँटी-लिथियासिस’ गुणधर्म देखील आहेत. हे गुणधर्म दगड फोडण्याबरोबरच पुन्हा तयार होण्यापासूनदेखील रोखतात. यामुळे तुळशी केवळ तात्पुरता नव्हे, तर दीर्घकालीन उपायसुद्धा ठरू शकते.

‘असा’ बनवा तुळशीचा चहा

तुळशीचा चहा बनवण्यासाठी, 4-5 ताजी तुळशीची पाने उकळत्या पाण्यात 5-7 मिनिटे शिजवून घ्या. त्यात थोडे मध मिसळून दिवसातून एकदा किंवा दोनदा प्यावे. ही सवय दीर्घकाळ ठेवल्यास किडनी स्टोनपासून संरक्षण मिळते आणि शरीराचे डिटॉक्सही होते.

 

तुळशीचा चहा हा केवळ किडनी स्टोनसाठीच नाही, तर शरीरातील सूज, विषारी द्रव्ये आणि पचनसंस्थेसाठीही उपयुक्त आहे. त्यामुळे रोज सकाळी रिकाम्या पोटी किंवा संध्याकाळी हा चहा घेतल्यास आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदा होतो.

मात्र, काही गंभीर परिस्थितींमध्ये तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. घरगुती उपायांबरोबरच वैद्यकीय निदानही तितकेच महत्त्वाचे आहे. पण जर तुम्ही सुरुवातीच्या टप्प्यात असाल, तर तुळशीचा चहा तुमच्यासाठी बराच फायदेशीर ठरू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!